“परळीतील मतदारांची मोठी चूक, पंकजा मुंडेंसाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार”

विधानसभा निवडणुकीतील परळी मतदारसंघातील (Maharashtra Assembly Election) लढत सर्वात फायप्रोफाईल ठरली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला.

परळीतील मतदारांची मोठी चूक, पंकजा मुंडेंसाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार
Follow us
| Updated on: Oct 26, 2019 | 11:08 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील परळी मतदारसंघातील (Maharashtra Assembly Election) लढत सर्वात फायप्रोफाईल ठरली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर राज्यभरात पंकजा मुंडेंच्या समर्थकांना धक्का बसला. आता आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा (Resignation for Pankaja Munde) देण्याची तयारी दाखवली आहे. तसेच त्यांना गंगापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची विनंती केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ श्रीराम फड यांनी प्रसिद्धीपत्रक काढत याची माहिती दिली आहे.

फड म्हणाले, “पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्याने आमदार रत्नाकर गुट्टे हे अत्यंत दुःखी झाले होते. पंकजा मुंडे निवडून यायला हव्या होत्या असे म्हणताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. परळीतील मतदारांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करुन मोठी चूक केली आहे, असंही गुट्टे म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या विजयाबद्दल गंगाखेड मतदारसंघात कोणताही विजयोत्सव साजरा न करण्याच्या सुचनाही केल्या होत्या.

पंकजा मुंडे आणि महादेव जानकर बहिण-भाऊ आहेत. पंकजा मुंडेंसाठी मी गंगाखेड मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. पंकजा मुंडेंनी गंगाखेडमधून निवडणूक लढवावी, असं मत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केल्याचीही माहिती फड यांनी दिली.

परळी मतदारसंघात निवडणुकीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यात अखेरच्या दिवशी झालेल्या घटनाक्रमाने तर पंकजा मुंडे यांचाच विजय होईल, असं बोललं गेलं. मात्र, प्रत्यक्ष निकालाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. परळीच्या मतदारांनी या सर्व घडामोडींनंतरही धनंजय मुंडे यांना कौल दिला.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.