Rohit Pawar News : पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो, माझ्यासाठी.., राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज?
NCP MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. विरोधी पक्ष लढत नाही, लोक नाराज आहेत. सात वर्ष झाले पक्षात आहे, पण मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असेल, असंही रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे पक्षात रोहित पवार नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत रोहित पवार म्हणाले की, ‘पक्षाची जी बैठक झाली त्यात मी आजारी असल्यामुळे जाऊ शकलो नाही. त्यामुळे त्यात काय चर्चा झाली ते मी सांगू शकणार नाही. पण अजूनपर्यंत माझ्याकडे कोणतीही जबाबदारी आलेली नाही. पण जबाबदारी दिली नाही म्हणून मि नाराज आहे, असा अर्थ नाही. सात वर्ष मी पक्षासाठी लढत आहे, मात्र त्यात मी कमी पडत आहे, असं काही नेत्यांना वाटत असावं. पण फक्त आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला किंवा नसला तरी मी लोकांच्या हितासाठी लढत आलेलो आहे. शरद पवार यांचा मला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम पाठिंबा राहिलेला आहे. तोच एक पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे, असंही रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
