AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिवसेनेचे अनेक जण आमच्या संपर्कात, भूमरेंचा दावा

शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भूमरे हे अखेर 15 दिवसांनी आपल्या घरी परत आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra politics : राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिवसेनेचे अनेक जण आमच्या संपर्कात, भूमरेंचा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 06, 2022 | 3:15 PM
Share

औरंगाबाद : शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) हे पंधरा दिवसांनी आपल्या घरी परतले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही गद्दारी केली नाही आम्ही राज्यसभेत आणि विधानपरिषदेत पक्षांनी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केलं. संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार नाही झालो तर आमच्यामुळे संजय राऊत खासदार झाले आहेत. संजय राऊत हे उरलेली सेना देखील संपवणार आहेत. राऊत यांच्यामुळेच हे बंड झालं. या सगळ्या प्रकाराला संजय राऊत हेच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका संदिपान भूमरे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेत जे लोक सध्या शिल्लक आहेत त्यातील अनेक जण आमच्या संर्पकात असल्याचा दावा देखील भूमरे यांनी केला आहे.

आमचा शिंदे साहेबांना पाठिंबा

पुढे बोलताना भूमरे म्हणाले की, आज पंधरा दिवसानंतर आम्ही घरी आलो आहोत. घरापासून दूर होतो, एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही विचार न करता त्यांच्यासोबत गेलो. आम्ही पैसा किंवा पदाच्या लालसेने गेलो नव्हतो, पैशांना मी आयुष्यात कधीही महत्त्व दिलेलं नाही. आम्ही शिंदे साहेबांसाठी गेलो. उध्दव ठाकरे यांच्या जवळचे लोक आम्हाला भेटू देत नव्हते आमचे कामं होत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला अडचणीत आणत होती, त्यामुळे हे बंड करावं लागलं. आता उद्धव ठाकरे हे रोज बैठका घेतात. सेनाभवनला जातात. त्यांनी हेच जर आधी केलं असतं आम्हाला भेट दिली असती, आमचे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती असं भूमरे यांनी म्हटले आहे.

भूमरेंनी सुरक्षा नाकारली

जे आमदार शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्या आमदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सेवा पुरवण्यात येत आहे. मात्र संदिपान भूमरे यांनी  ही सुरक्षा नाकारली आहे. सुरक्षेची गरज नसल्याचे संदिपान भूमरे यांनी म्हटले आहे. भूमरेंपूर्वी गुलाबराव पाटलांनी देखील असाच आरोप केला होता. आमच्या नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचे पाटील यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला होता.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.