कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, वाचा पत्र जसेच्या तसे

कुटुंबातील सदस्याचे कोरोनामुळे निधन झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे खुद्द राज ठाकरे यांनी घरी पत्र पाठवून सांत्वन केले (Raj Thackeray condolence letter)

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, वाचा पत्र जसेच्या तसे
राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना सांत्वनपत्र
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 3:31 PM

मुंबई : कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerau) यांनी सांत्वन केले. राज ठाकरे यांनी दुःखात बुडालेल्या अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक पत्र पाठवून त्यांना धीर दिला. राज ठाकरे यांच्या आपुलकीचं कौतुक केलं जात आहे. (MNS Chief Raj Thackeray writes condolence letter to party volunteers who lost family members to battle with Corona)

कुटुंबातील सदस्याचे कोरोनामुळे निधन झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे खुद्द राज ठाकरे यांनी घरी पत्र पाठवून सांत्वन केले. प्रत्येक विभाग अध्यक्षावर हे पत्र कार्यकर्त्याच्या पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. माहिम विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आज त्यांच्या विभागातील पत्र घरी पोहोचवली.

पत्रातील मजकूर काय?

आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.

परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा

आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना

ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो

आपला नम्र राज ठाकरे

नांदेडमधील पदाधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर फोन

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. यामुळे खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेही अस्वस्थ झाले होते. राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्यांचे बंधू अनिल यांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी अनिल ईरावर यांचे फोनवरुन सांत्वन केले. काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन, काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला दिला होता.

संबंधित बातम्या :

मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन, भावाच्या अश्रूंचा बांध फुटला

तुम्ही खचलात, उन्मळून पडलात, तर मला जास्त त्रास होईल, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

(MNS Chief Raj Thackeray writes condolence letter to party volunteers who lost family members to battle with Corona)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.