रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेची निवडणूक आयोगाकडं मागणी

पुण्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. मैदानांवर अगदी चिखलाचं साम्राज्य तयार झालं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रचारात अडचण तयार झाली आहे.

रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेची निवडणूक आयोगाकडं मागणी

पुणे: पुण्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. मैदानांवर अगदी चिखलाचं साम्राज्य तयार झालं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रचारात अडचण तयार झाली आहे. पुण्यातील मुसळधार पावसाने राज ठाकरेंची (Raj Thackeray in Pune) बुधवारी (9 ऑक्टोबर) होणारी पहिला प्रचारसभा (MNS Election Campaign) देखील रद्द करावी लागली. त्यामुळे अखेर मनसेनं निवडणूक आयोगाकडं (MNS Demand to Election Commission) रस्त्यावर सभा घेऊ द्या, अशी मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली.

बाळा नांदगावकर म्हणाले, “शहरातील मुख्य वर्दळीचे वाहतूकीचे रस्ते वगळता इतर रस्त्यांवर सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. गुरुवारी कसबा येथील मनसेची सभा मुसळधार पावसाने मैदानवर तयार झालेल्या चिखलामुळे रद्द करावी लागली. या ठिकाणी मनसेच्या उमेदवारासह कार्यकर्त्यांनी मैदानावरील पाणी काढले, तेथे भुसा टाकला. सर्व तयारी झाली आणि पुन्हा पाऊस आला. त्यामुळे प्रचंड चिखल तयार झाला. अखेर सभा रद्द करावी लागली.”

अनेक ठिकाणी मैदानांच्या ठिकाणी सायलन्ट झोन (शांतता परिसर) आहे. हवामान खात्यानं 20 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या काळात मैदानात प्रचारसभा घेणे शक्य होणार नाही. असाच पाऊस पडत राहिला तर मैदानांवर चिखल होईल आणि चिखलात सभा घेता येणार नाही. त्यामुळे एकही सभा घेता येणार नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाला आम्ही रस्त्यावर सभेच्या परवानगीची विनंती केली, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

याआधीही रस्त्यावर सभा घेतल्या जायच्या. निवडणूक आयोगाकडून त्याला परवानगी दिली जायची. याचा लेखाजोखा निवडणूक आयोगाकडे आहे. 8 ते 10 दिवसांसाठीच याची गरज आहे. ही फक्त मनसेसाठी मागणी नाही, तर सर्वच पक्षांसाठी ही व्यवस्था उपलब्ध करावी, असं आम्ही म्हटलं आहे, असंही नांदगावकर यांनी नमूद केलं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI