मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्यूवर मनसे नेत्याची सडकून टीका

मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्यूवर मनसे नेत्याची सडकून टीका
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे

प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखं पॅकेज द्या, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली

अनिश बेंद्रे

|

Dec 23, 2020 | 12:28 PM

मुंबई : “मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी रात्रीच्या संचारबंदीवर टीकेची झोड उठवली. “तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे” असा निशाणाही देशपांडेंनी ठाकरे सरकारवर साधला. (MNS Leader Sandeep Deshpande on Thackeray Govt Night Curfew)

“काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली?” असे सवाल संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारले आहेत. “या संपूर्ण वर्षात लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखं पॅकेज द्या” अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केली.

“कोरोनाची फक्त भीती दाखवू नका. तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त कोरोना, असं आहे” असा टोला देशपांडेंनी लगावला. “या लॉकडाऊनच्या काळात कोणी नाईट लाईफ एन्जॉय केली, हे सर्वांना माहीत आहे, समजने वाले को इशारा काफी है, नाव घ्यायची गरज नाही” असा इशारा त्यांनी दिला. “व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे?” असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला.

संदीप देशपांडे यांचं ट्विट

नाईट कर्फ्यू

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू झाली. आता वेळ पडल्यास मुंबई आणि अन्य महापालिका क्षेत्रांबाहेरही नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य सचिवांची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करु शकतील.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नाईट कर्फ्यूचा निर्णय घ्या; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

नाईट कर्फ्युमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज? शरद पवारांच्या भेटीला जाण्याची शक्यता

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

(MNS Leader Sandeep Deshpande on Thackeray Govt Night Curfew)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें