AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत मोठी अपडेट, ‘या’ दोन बड्या नेत्यांची भेट, काय चर्चा झाली?

मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या 2 प्रमुख नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत मोठी अपडेट, 'या' दोन बड्या नेत्यांची भेट, काय चर्चा झाली?
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 29, 2025 | 3:55 PM
Share

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरु आहे. याबाबत दोन्ही पक्षांकडून सूचक विधानेही करण्यात आलेली आहेत. अशातच आता या युतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या 2 प्रमुख नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘या’ दोन नेत्यांची झाली भेट

समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट झाली. या भेटीबाबत बाळा नांदगावकर यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत बोलताना नांदगावकर यांनी, भेटीगाठी होतच असतात. मित्र म्हणून भेटतात.चर्चेसाठी भेटतात. वेगवेगळे विषय असतातच असं विधान केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये युतीबाबत चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे.

मनसे आणि ठाकरे गट 5 जुलै रोजी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहे. याबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले की, ‘राजकारणापेक्षा आपल्या अस्मितेच आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. याचा सर्वाधिक विचार केला पाहिजे. उद्याच्या मोर्चाचं विजयात रूपांतर करू असा विश्वास आहे.’

देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील

पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की, ‘विरोधकांचा विषय इथे येतच नाही. जे कोणी विरोधक म्हणून आम्हाला बोलत आहे ते मराठी नाहीत का? त्यांची भाषा मराठी नाही का? देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. ते याचा नक्कीच विचार करतील. सर्वांना विचारात घेऊन काम करतील आणि कुठलीही सक्ती करणार नाहीत.’

हिंदी भाषिकांनाही मोर्चासाठी आमंत्रण

मनसे आणि ठाकरे गटाच्या हिंदी विरोधातील मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रण देण्यात येत आहे. याबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले की, ‘आम्ही सगळ्यांना आमंत्रण देत आहोत. हिंदी भाषिकांना देखील आम्ही आमंत्रण दिलेले आहे. कारण याच महाराष्ट्राने आणि मराठीने त्यांना भरपूर काही दिले आहे. आता या भाषेचा सन्मान करण्याची वेळ आहे.’

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती