Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात कपिल पाटलांना स्थान मिळण्याची शक्यता, कसा आहे राजकीय आलेख?

कपिल पाटील यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात कपिल पाटलांना स्थान मिळण्याची शक्यता, कसा आहे राजकीय आलेख?
खासदार कपील पाटील
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 8:47 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील 24 तासांत होण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील खासदार नारायण राणे यांच्यासह कपिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे. कपिल पाटील यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (MP Kapil Patil likely to get a chance in Union Cabinet, Patil’s political journey)

कपील पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास

जन्म – 5 मार्च 1961 जन्मगाव – हायवे दिवे ता.भिवंडी शिक्षण – बी ए मुंबई विद्यापीठ सरपंच – 1988 – 1992 ग्रामपंचायत दिवे अंजुर सदस्य – 1992 – 1996 पंचायत समिती भिवंडी सभापती – 1997 पंचायत समिती भिवंडी सदस्य – 2002 – 2007 जिल्हा परिषद ठाणे सभापती – 2005 – 2007 जिल्हा परिषद कृषी समिती अध्यक्ष – 2009 – 2012 जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे सतत 2010 – 2011 आणि 2011 – 2012 या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला आहे.

नारायण राणे दिल्लीत दाखल

भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. त्या पार्श्वभूमीवर राणे यांना आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आला त्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. राणे यांची जे. पी. नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील 24 तासांत होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कुणाची वर्णी?

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 8 जुलैला होण्याची शक्यता, राणेंना स्थान देण्यामागे भाजपची रणनिती काय?

MP Kapil Patil likely to get a chance in Union Cabinet, Patil’s political journey

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.