5

PM Modi Birthday | ‘बँका हमी देत ​​नाहीत तेव्हा मोदी हमी देतात…’, पंतप्रधान मोदी यांचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर 'यशोभूमी'चं उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केली. या माध्यमातून विश्वकर्मा सहकाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं. या योजनेवर 13 हजार कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे.

PM Modi Birthday | 'बँका हमी देत ​​नाहीत तेव्हा मोदी हमी देतात...', पंतप्रधान मोदी यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 10:33 PM

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील द्वारका येथे स्थित इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर ‘यशोभूमी’ चे उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी येथे विश्वकर्मा योजना सुरू केली. तसेच 18 कामगारांना प्रमाणपत्रही दिलं आहे. विश्वकर्मा योजनेची सुरुवात करत पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आजचा दिवस सर्व शिल्पकारांनी समर्पित आहे. विश्वकर्मा योजनेवर 13 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. योजने अंतर्गत विश्वकर्मा सहकार्यांच्या ट्रेनिंगवर जोर दिला जाणार आहे.’ असं देखील मोदी म्हणाले. एवढंच नाही तर, ‘जेव्हा बँक हमी देत ​​नाही, तेव्हा मोदी हमी देतात…’ सध्या सर्वत्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा चर्चा रंगत आहे.

इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (IICC) – ‘यशोभूमी’ च्या फेज-1 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज विश्वकर्मा जयंती आहे, हा दिवस कारागिरांना समर्पित आहे. मी देशाला विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देतो.” पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘बँका हमी देत ​​नाहीत तर मोदी हमी देतात.’ सध्या सर्वत्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा चर्चा रंगत आहे.

कारागीर आणि शिल्पकारांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली. यावेळी मोदी यांनी यशोभूमी कॉन्फरन्स सेंटरमध्ये उपस्थितांना संबोधित देखील केलं. मोदी म्हणाले, ‘घरगुती वस्तूंचा प्रचार करण्याच्या उद्देशाने ‘व्होकल फॉर लोकल’ अभियान एक जबाबदारी आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सर्वांना प्रयत्न करण्याची गरज आहे… ‘ विश्वकर्मा योजना आणि IICC च्या उद्घाटनाप्रसंगी ‘आमच्या विश्वकर्मा मित्रांनाही यशोभूमी कॉन्फरन्स सेंटरचा फायदा होईल.’ असं देखील मोदी म्हणाले..

पंतप्रधानांनी लोगो आणि पोर्टलचंही केलं लोकार्पण

पंतप्रधान म्हणाले, ‘ कन्वेंशन सेंटरची भारतीय हस्तकलेला जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका असणार आहे. विश्वकर्माची ओळख आणि त्यांना सर्वतोपरी साथ देणे ही काळाची गरज आहे.’ पंतप्रधान मोदी फेब्रुवारी २०२३ मध्ये या योजनेची घोषणा करताना, पीएम मोदी म्हणाले होते, ‘एमएसएमई मंत्रालयाच्या अधिकृत पीएम विश्वकर्मा वेबसाइटनुसार, “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान म्हणजेच पंतप्रधान विश्वकर्मा करोडो विश्वकर्मांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणतील.’

द्वारका येथे यशोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (IICC) च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी आज ‘PM विश्वकर्मा’ योजनेचा लोगो, प्रतीक आणि पोर्टलचे अनावरण केलं. सध्या सर्वत्र पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

Non Stop LIVE Update
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'