भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाचा प्रयत्न; काँग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाप्रकरणी औरंगाबादेत काँग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांचा देखील समावेश आहे.

भागवत कराड यांच्या घरावर मोर्चाचा प्रयत्न; काँग्रेसच्या 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
काँग्रेसचा मोर्चा
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 1:56 AM

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याविरोधात आज औरंगाबादमधील काँग्रेस (Aurangabad congress) कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या घरासमोर आंदोलन करणार असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल दिला होता. त्यानुसार, आज शनिवारी सकाळीच शेकडो कार्यकर्ते क्रांती चौक येथे जमले होते. त्यानंतर हा मोर्चा केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घराकडे निघाला. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवलं. दरम्यान आता या प्रकरणात  काँग्रेसच्या तब्बल 120 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काही नेत्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्यासह तब्बल 120 जणांचा समावेश आहे.

डॉ. कराड यांच्या घरी भाजप कार्यकर्ते

दरम्यान, काल काँग्रेसने भाजपविरोधात हे निषेध आंदोलन करण्याचं घोषित केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही याचा विरोध करण्याचं ठरवलं. त्यानुसार, डॉ. भागवत कराड यांच्या घरी शहरातील सर्व भाजप नेते आणि कार्यकर्ते जमले होते. काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही शहरात एकवटले. मात्र भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता. भागवत कराड यांच्या घराकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी क्रांती चौकमध्येच अडवलं, पोलिसांनी अडवल्यानंतर काँग्रेसच्या वतीने क्रांती चौकातच आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी आता काँग्रेसच्या 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यभरात काँग्रेस आंदोलन का करत आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना देशातील कोरोनाचा प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षातून यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते भाजप नेत्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचे देखील पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : ‘थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है’, शायरीद्वारे कौतुक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचीही दाद

Eknath Shinde : वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काय हरकत नाही, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

Non Stop LIVE Update
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.