काँग्रेसच्या मुलाखतींकडे अनेक नेत्यांची पाठ, आता शिवसेनेत मेगा भरती?

पक्षातून आऊटगोईंग सुरु असताना काही वरिष्ठ नेत्यांनी विविध कारणं देत मुलाखतींकडे (Congress candidate Interview) पाठ फिरवली. यापैकी काही जण शिवसेनेत जाणार असल्याचंही बोललं जातंय. बुधवारी भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळे आता शिवसेनेतही 'मेगा भरती' होणार का याकडे लक्ष लागलंय.

काँग्रेसच्या मुलाखतींकडे अनेक नेत्यांची पाठ, आता शिवसेनेत मेगा भरती?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती (Congress candidate Interview) सुरु आहेत. पण मुंबईतलं चित्र काँग्रेससाठी चिंता वाढवणारं आहे. पक्षातून आऊटगोईंग सुरु असताना काही वरिष्ठ नेत्यांनी विविध कारणं देत मुलाखतींकडे (Congress candidate Interview) पाठ फिरवली. यापैकी काही जण शिवसेनेत जाणार असल्याचंही बोललं जातंय. बुधवारी भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळे आता शिवसेनेतही ‘मेगा भरती’ होणार का याकडे लक्ष लागलंय.

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनी कलिनातून इच्छुक म्हणून अर्जही केला नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे मालाडचे विद्यमान आमदार असलम शेख शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच शेख यांनी मुलाखतीला दांडी मारली. कृपाशंकर सिंग आणि असलम शेख मुलाखतीला न आल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

कृपाशंकर सिंग भाजपात, तर असलम शेख हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेने मुंबईत वाट्याला येणारे मतदारसंघ मजबूत करण्यावर भर दिलाय. त्यातच इतर पक्षांमधूनही शिवसेनेत काही नेते जाणार असल्याची माहिती आहे.

मुलाखतीला न आलेले नेते

असलम शेख (मालाड)

कृपाशंकर सिंग ( कलिना )

वर्षा गायकवाड ( धारावी )

अमिन पटेल ( मुंबादेवी )

शिवसेनेतही मेगा भरती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय. यानंतर राज्यातील काही मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांचं कुटुंबही शिवसेनेत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक आणि त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नाईक कुटुंबाच्या रुपाने शिवसेनेला विदर्भात बळ मिळणार आहे. यासोबतच आणखी काही मोठे प्रवेश शिवसेनेत होण्याची शक्यता आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI