AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MP Civic Polls Result : भाजपला “आप”चा ताप, मध्य प्रदेशात नगराध्यक्षपद नाकाखालून काढलं, सिंगरौलीत दणदणीत विजय

राणी यांनी 2014 ची पहिली निवडणूक जिल्हा पंचायत सदस्य म्हणून लढवली आणि जिंकली. जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी राणी यांना समान मते मिळाली, पण ट्रायमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

MP Civic Polls Result : भाजपला आपचा ताप, मध्य प्रदेशात नगराध्यक्षपद नाकाखालून काढलं, सिंगरौलीत दणदणीत विजय
भाजपला "आप"चा ताप, मध्ये प्रदेशात नगराध्यक्षपद नाकाखालून काढलं, सिंगरौलीत दणदणीत विजयImage Credit source: twitter
| Updated on: Jul 17, 2022 | 6:56 PM
Share

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे नगरपालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर (Madhya Pradesh Civic Polls Result) आले आहेत. येथे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) अनपेक्षित विजय मिळवला आहे. आपच्या राणी अग्रवाल (Rani Agrawal) यांनी भाजपच्या चंद्र प्रताप विश्वकर्मा यांचा 9352 मतांनी पराभव केला. ही जागा पूर्वी भाजपच्या ताब्यात होती. ‘आप’ने भाजपचा बालेकिल्ला आपला बनवला आहे. यासह ‘आप’चा राज्यातील पहिला महापौर ठरला आहे. सिंगरौलीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा राणी अग्रवाल या मारवाडी कुटुंबातील आहेत. ते प्रदीर्घ काळ समाजसेवेशी आणि राजकारणाशी जोडलेल्या आहेत. राणी यांनी 2014 ची पहिली निवडणूक जिल्हा पंचायत सदस्य म्हणून लढवली आणि जिंकली. जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी राणी यांना समान मते मिळाली, पण ट्रायमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

केजरीवाल यांचं ट्विट

बडे नेते प्रचारात दिसले

त्यानंतर 2018 मध्ये राणी आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. आणि अत्यंत कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्या. तेव्हापासून त्यांनी पुन्हा जोमाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. यावेळी आम आदमी पक्षाने पुन्हा महापौरपदाचा उमेदवार उभा करून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. एवढेच नाही तर या भागातील अनेक नगरसेवक ‘आप’चे निवडून आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार राणी अग्रवाल निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर येथे रोड शो केला. त्यांनी राणी अग्रवाल यांच्या बाजूने प्रचार केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी.डी.शर्मा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रोड शो करून आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

मतदार वर्गात नाराजी

सिंगरौलीच्या नगराध्यक्षा राणी अग्रवाल शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आधीच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. फॉर्म भरण्यासाठी त्या व्हीलचेअरवर आल्या होत्या, मात्र गेल्या निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झाल्यानंतर लोकांची सहानुभूतीही दिसून आली. येथे भाजपचे आमदार राम लल्लू वैश यांनी चंद्र प्रताप विश्वकर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. सर्वसाधारण जागेवर मागासवर्गीय उमेदवार उभे केल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फायदा ‘आप’च्या उमेदवार राणी अग्रवाल यांना झाला आणि ही जागा काबीज करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.