VIDEO : खासदार नवनीत राणांचा दांडीयाच्या गाण्यावर ठेका

येत्या काही दिवसात नवरात्रौत्सव सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

  • Updated On - 3:21 pm, Sun, 29 September 19 Edited By: Anish Bendre
VIDEO : खासदार नवनीत राणांचा दांडीयाच्या गाण्यावर ठेका
नवनीत राणांसोबत इतर महिलांनीही दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.

अमरावती : येत्या काही दिवसात नवरात्रौत्सव सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात खासदार नवनीत राणा (Navneet rana garba dance) यांनी हजेरी लावली.

यावेळी खासदार नवनीत राणा (Navneet rana garba dance) यांनी या कार्यक्रमात महिलांसोबत दांडीया खेळल्या. त्यांनी हजेरी लावल्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. येथे मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात महिलांसोबत नवनीत राणा यांनी दांडीया खेळल्या. 15 मिनिटं राणा यांनी या कार्यक्रमात दांडीया खेळत महिलांचा उत्साह वाढवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सिनेअभिनेत्री म्हणून नवनीत राणा या प्रसिद्ध आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून विजय मिळवला. नवनीत राणा यांचे पती रवी राणाही विद्यमान आमदार आहेत.

दरम्यान, नवनीत राणा यांनी निवडून आल्यानंतर कामांचा धडाका लावलाय. जिल्ह्यामध्ये फिरुन समस्या समजून घेणे, प्रशासनाला योग्य आदेश देणे यासह विविध कामे त्यांच्याकडून केली जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कुपोषणाचं प्रमाण मोठं आहे. याकडेही नवनीत राणा लक्ष देत आहेत. शिवाय त्यांनी संसदेतही निराधारांना जास्त मदत देण्याची मागणी केली होती.