नि. नौदल अधिकारी मारहाण : मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन : नवनीत राणा

गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही," असे नवनीत राणा म्हणाले.(Navneet Rana on Shivsainiks beating a retd Indian Navy officer)

नि. नौदल अधिकारी मारहाण : मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन : नवनीत राणा
Follow us
| Updated on: Sep 13, 2020 | 8:35 PM

नवी दिल्ली : “माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधताना एकही शब्द न बोलणं म्हणजे त्या हल्ल्याचं समर्थन होय,” अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली. (Navneet Rana on Shivsainiks beating a retd Indian Navy officer)

“संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करीत नाही. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. याप्रकरणी लोकसभेत आवाज उचलणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष भेटून माजी सैनिकांची कैफियत मांडणार आहे. याबाबत न्याय मिळवून देऊ. देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,” असे नवनीत राणा म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधला. आज मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला दिशा दाखवतील आणि काही दिलासा देतीलय या अपेक्षेने जनता डोळे लावून बसली होती. पण जनतेचा भ्रमनिरास झाला. हा संवाद नव्हता तर केवळ शब्दांचा खेळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता.

“काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एक माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी भ्याड हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ करुन बेदम मारहाण केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्याचे निर्लज्जपणे समर्थन केले. हा केवळ एका माजी सैनिकवरील हल्ला नव्हता. तर देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या, घरदारापासून दूर राहून देशसेवा करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून देशवासियांची सेवा करणाऱ्या संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा हा अपमान होता,” असेही नवनीत राणा म्हणाल्या.

“माजी सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा हा प्रयत्न होता. आजच्या संबोधनात मुख्यमंत्री याविषयी काहीतरी बोलतील किंवा दिलगिरी तरी व्यक्त करतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक शब्दही काढला नाही यावरुन त्यांना माजी सैनिकांबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होते. उलट संजय राऊत यांनी या हल्ल्याचे समर्थन केले. म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे सुद्धा या हल्ल्याला समर्थन होते. हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. खासदार नवनीत रवी राणा या मुद्दयावर अत्यंत आक्रमक झाल्या असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे,” असे नवनीत राणा यांनी सांगितले.

“माजी सैनिक या देशाची शान आहे. राष्ट्राचा स्वाभिमान आहे. एक खासदार म्हणून आपण त्यांच्याप्रती कायम आदर बाळगून ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे सांगून या हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी. त्यांना 2 तासात जामीन कसा मिळाला? त्यांना सोडणे म्हणजे सैनिकांची थट्टा होय,” असेही नवनीत राणा म्हणाले.

याप्रकरणी लोकसभेत सुद्धा हा प्रश्न मांडून सनदशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील जनतेने ठामपणे माजी सैनिकांचे पाठीशी उभे राहावे आणि महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. त्यासाठी तमाम महाराष्ट्रवासियांनी सुद्धा या अन्यायाविरुद्ध एक व्हावे, असे आवाहन खासदार नवनीत रवी राणा यांनी केले. (Navneet Rana on Shivsainiks beating a retd Indian Navy officer)

संबंधित बातम्या : 

कांदिवलीत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण, अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन

नि. नौदल अधिकारी मारहाण : शिवसेनेविरोधात भाजपचं आंदोलन, नांगरे पाटील घटनास्थळी, गृहमंत्र्यांचा दरेकरांना फोन

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.