सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी, मग आता मुख्यमंत्री का देत नाहीत?, संभाजीराजेंचा सवाल

शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान पाहणीसाठी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. 

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी, मग आता मुख्यमंत्री का देत नाहीत?, संभाजीराजेंचा सवाल

सोलापूर : पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पाऊस (MP Sambhajiraje Pandharpur) पडला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान पाहणीसाठी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पंढरपूर दौऱ्यावर होते (MP Sambhajiraje Pandharpur).

यावेळी त्यांनी कासेगाव परिसरात द्राक्ष बागा डाळिंब बागा, ऊस शेतीची नुकसान पाहणी केली. पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला. “मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजाराची मदत द्या, अशी मागणी केली होती. मग, आता ते का देत नाहीत”, असा सवाल संभाजीराजेंनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे, असा सल्लाही यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपला लढा सुरु असून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी घेऊन जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शवला.

पंढरपुरात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान

शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाने पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी फळबागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

MP Sambhajiraje Pandharpur

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

Published On - 12:01 am, Sun, 18 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI