AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस आणि संरक्षण क्षेत्राच्या नोकरीतील दिव्यांगांचे आरक्षण रद्द; केंद्रानं फेरविचार करावा, सुप्रिया सुळे यांची मागणी

दिव्यांग अधिकार कायदा, 2016 नुसार दिव्यांगांना पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल यांसारख्या विभागांत नियुक्त्यांमध्ये 4 टक्के आरक्षण दिलं जात होतं. मात्र, केंद्र सरकारनं नवीन अधिसूचना काढून हा आरक्षण कोटा संपुष्टात आणला आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केलीय.

पोलीस आणि संरक्षण क्षेत्राच्या नोकरीतील दिव्यांगांचे आरक्षण रद्द; केंद्रानं फेरविचार करावा, सुप्रिया सुळे यांची मागणी
उद्धव ठाकरे शेतकऱ्याला भेटत नाहीत; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची सुप्रियाताईंपुढे 'लाईव्ह' तक्रार
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 11:05 PM
Share

मुंबई : दिव्यांगांना पोलीस आणि संरक्षण क्षेत्रातील नोकरीत दिल्या जाणाऱ्या 4 टक्के आरक्षणाचा कोटा केंद्र सरकारनं रद्द केलाय. सरकारच्या काही विभागांत, विशेषत: संरक्षणासंबंधीच्या विभागांमध्ये सवलत दिली जाते. दिव्यांग अधिकार कायदा, 2016 नुसार दिव्यांगांना पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल यांसारख्या विभागांत नियुक्त्यांमध्ये 4 टक्के आरक्षण दिलं जात होतं. मात्र, केंद्र सरकारनं नवीन अधिसूचना काढून हा आरक्षण कोटा संपुष्टात आणला आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केलीय. आरक्षण रद्द करण्याचा हा निर्णय दिव्यांगांच्या हितावर व्यापक व दूरगामी परिणाम करणारा असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. (MP Supriya Sule demands reconsideration of decision to cancel the reservation for the disabled)

“केंद्र सरकारने पोलीस दल व रेल्वे संरक्षण दल यांसारख्या सेवांमधील दिव्यांगांचे चार टक्के आरक्षण रद्द केले.हा निर्णय दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणणारा आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमारजी आपणास विनंती आहे की, दिव्यांगांच्या हितासाठी याचा फेरविचार व्हावा. आरक्षण रद्द करण्याचा हा निर्णय दिव्यांगांच्या हितावर व्यापक व दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामुळे यासंदर्भात दिव्यांग व इतर संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करण्याची गरज आहे. कृपया आपण या मागणीचा सकारात्मक विचार कराल हा विश्वास आहे”, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलंय. या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारची अधिसूचना काय?

दरम्यान, केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार प्रथमच भारतीय पोलीस सेवाअंतर्गत सर्व दर्जाच्या पदांसाठी दिल्ली, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप, दिव आणि दमण, दादरा-नगर हवेली पोलीस सेवा अंतर्गत सर्व श्रेणीतील पदांसाठी आणि भारतीय रेल्वे सुरक्षा दलाअंतर्गत सर्व पदांच्या श्रेणींमध्ये आरक्षण लागू न करण्याची सूट देण्यात आली आहे. तर दिव्यांग व्यक्तीचे अधिकार कायदा 2016 च्या कलम 20 च्या उपकलम (1) आणि कलम 34 च्या उपकलम (1) ची दुसरी तरतूद करुन दिलेल्या अधिकारांचा वापर करताना केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दिव्यांग मुख्य आयुक्तांशी चर्चा करुन कामाचे स्वरुप लक्षात घेऊन नियम शिथील करतील, असं या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे कार्यकर्त्याच्या अजित पवारांना शुभेच्छा! सच्च्या कार्यकर्त्याला अजितदादांचाही प्रेमाचा सल्ला

संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात…

MP Supriya Sule demands reconsideration of decision to cancel the reservation for the disabled

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.