फक्त मुकेश अंबानी नव्हे, आणखी एका उद्योगपतीचा मिलिंद देवरांना पाठिंबा

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना भारतातील दोन बड्या उद्योगपतींनी पाठिंबा दिला आहे. या बातमीनंतर राजकारणासह उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. झालं असं की, काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी त्यांच्या ट्विटर …

फक्त मुकेश अंबानी नव्हे, आणखी एका उद्योगपतीचा मिलिंद देवरांना पाठिंबा

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना भारतातील दोन बड्या उद्योगपतींनी पाठिंबा दिला आहे. या बातमीनंतर राजकारणासह उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

झालं असं की, काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये काहीजण मिलिंद देवरा यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. दुकानवाला, पान टपरीवाला इथपासून ते भारतातील टॉप-10 मधील उद्योगपतींपर्यंतचे लोक आहेत. या व्हिडीओने देशभार खळबळ उडवली, याचे कारण उद्योगपती मिलिंद देवरा आणि उदय कोटक यांनीही या व्हिडीओच्या माध्यमातून मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री असून, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण मुंबईत 2014 साली शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात आहेत.

एकीकडे गगनचुंबी इमारती, उच्चभ्रू लोक आणि दुसरीकडे झोपडपट्टी, मध्यमवर्गीय जनता असा दोन ध्रुवांवरील वर्ग दक्षिण मुंबईत राहतो. काँग्रेसचं या लोकसभा मतदारसंघात कायमच वर्चस्व राहिलं आहे. मात्र, 2014 साली मोदीलाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी तत्कालीन विद्यमान खासदार असलेल्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला.

आता उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी थेट मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिल्याने, दक्षिण मुंबईची जागा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी म्हणाले, “मिलिंद देवरा हेच दक्षिण मुंबईसाठी योग्य आहेत. त्यांनी 10 वर्षे दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केले आहे. मला विश्वस आहे की, मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जाण आहे.” तर कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक म्हणाले, “मिलिंद खऱ्या अर्थाने ‘मुंबई का कनेक्शन’चं प्रतिनिधित्व करेल. त्याला मुंबईची नस माहित आहे. मुंबईकरांशी तो जोडला गेला आहे.”

उदय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक असून, भारतासह जगातील नामांकित बँकर्सच्या यादीत उदय कोटक यांचा समावेश होते. तर मुकेश अंबानी हे भारतासह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतले अव्वल उद्योगपती आहेत.

मुकेश अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याने, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. उद्योगपतींनी काँग्रेसच्या उमेदवारला पाठिंबा दिल्याने हे बदलाचे वारे आहेत की, उद्योगपतींनी आपापल्या व्यक्तिगत संबंधांवरुन पाठिंबा दिला आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *