AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ससारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी, मुनगंटीवारांची शिवसेनेवर टीका

शिवसेनेचे नेते किरोश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आर्यन खान प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी याचिकेद्वारे केलीय. आर्यन खानच्या समर्थनात शिवसेनेनं उचललेल्या या पावलावर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केलीय.

ड्रग्ससारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी, मुनगंटीवारांची शिवसेनेवर टीका
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 5:10 PM
Share

चंद्रपूर : मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वाचवण्यासाठी शिवसेना नेत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे नेते किरोश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आर्यन खान प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी याचिकेद्वारे केलीय. आर्यन खानच्या समर्थनात शिवसेनेनं उचललेल्या या पावलावर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केलीय. ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar criticizes ShivSena over Aryan Khan in mumbai drug case)

अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे वकील या प्रकरणात आर्यन खानची बाजू मांडतील. ड्रग्स सारख्या संवेदनशील विषयावर आर्यन खानची पाठराखण लाजिरवाणी बाब आहे. मात्र, याचिकाकर्त्यांना आर्यन निर्दोष असल्याचे कुणी सांगितले? त्यांना सहावे इंद्रिय आहे का? असा संतप्त सवाल मुनगंटीवार यांनी केलाय. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात मादक पदार्थांना आयुर्वेदिक औषधी असल्याचा शोध लावणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता हजारो वर्षे विसरणार नाही, असी टीकाही मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलीय.

मुनगंटीवारांचा अजित पवारांना टोला

त्याचबरोबर इंधर दरवाढ आणि महागाईवरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलेल्या टीकेलाही मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज्यातील स्थितीकडे दुर्लक्ष करुन केंद्रावर कपोलकल्पित आरोप करण्याची सामनाची सवल आहे. सामनाच्या बातमीवर भाष्य नको. केंद्रानं पेट्रोल-डीझेल जीएसटी अंतर्गत आणावं असा प्रस्ताव दिल्यावर रुसणारा अर्थमंत्री महाराष्ट्राच होता, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावलाय. 2024 मध्ये महाराष्ट्राची जनता त्यांना पंढरपूरसारखा झटका देणार, असा दावाही त्यांनी केलाय.

किशोर तिवारींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. एकीकडे 3 हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही लॉजिक काही निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही शुल्लक केस आहे. त्यात काही रिकव्हरी नाही. पजेशन नाही. आर्यनला 24 तासासाठी अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवलं गेलं. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आलं. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला बेल मिळणे हा त्याचा राईट आहे, असं तिवारी यांनी सांगितलं. इतरांना जामीन होतो. त्याला 17 दिवसांपासून आत ठेवलं आहे, याकडेही त्यांनी याचिकेत लक्ष वेधलं आहे.

‘एनसीबीच्या कामाची चौकशी व्हावी’

एनसबीच्या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या याचिकेत करण्यात आल्याचं किशोर तिवारी यांनी सांगितलं. एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. आर्यनचे मूलभूत अधिकार गोठवून ठेवले आहेत. सुट्टी आहे म्हणून त्याला पाच दिवस डांबून ठेवलं गेलंय, असं सांगतानाच झोनल अधिकाऱ्याचा बॉलिवूडमध्ये वेस्टेड इंट्रेस्ट आहे. त्यांची पत्नी सिनेमात काम करते. मॉडल आहे. हा माणूसही कलाकारासारखं काम करतो. हा सर्व त्यांचा दुराग्रह आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे काम करतात. वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि आर्यनला बेल मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप, अतुल लोंढेंची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

Sudhir Mungantiwar criticizes ShivSena over Aryan Khan in mumbai drug case

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...