नानांनी कारभारी बदलले, काँग्रेसची दशा-दिशा बदलेल? अतुल लोंढे मुख्य प्रवक्तेपदी

नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आलं आहे. अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.

नानांनी कारभारी बदलले, काँग्रेसची दशा-दिशा बदलेल? अतुल लोंढे मुख्य प्रवक्तेपदी
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 5:16 PM

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केलं आहे. अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. (Appointment of Atul Londhe as the Chief Spokesperson of the Congress)

माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

आघाडी संघटना, विभाग व सेल

आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस, तर माजी आमदार दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समिती, प्रशिक्षण विभाग

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी शाम उमाळकर, संजय बालगुडे, सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकीय कार्यक्रम नियोजन समिती, बुथ विस्तार समिती

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

मुंबई महापालिकेवर भाजपचा इंजेक्शन घोटाळ्याचा आरोप, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला सवाल

Appointment of Atul Londhe as the Chief Spokesperson of the Congress

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.