मुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं? तुंबलेल्या मुंबईवरुन भाजपचा खोचक सवाल

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिल? असा खोचक सवाल केलाय.

मुंबई आमची असा उठता बसतां ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं? तुंबलेल्या मुंबईवरुन भाजपचा खोचक सवाल
केशव उपाध्ये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 6:45 PM

मुंबई : मान्सूच्या पहिल्याच पावसापासू मुंबईत अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये, अनेकांच्या घरात पाणी शिरतंय. गेल्या चार दिवसांपासून मुंबईत अशीच स्थिती पाहायला मिळतेय. सायन, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, धारावी आणि चेंबूर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीवरही मोठा परिणाम होतोय. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिल? असा खोचक सवाल केलाय. (Keshav Upadhyay criticizes Shiv Sena over water logging in Mumbai)

“नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पण मुंबईच्या विकासात भरीव योगदान केलं. गडकरींनी मुंबईत 56 पूल बांधले, फडणवीसांनी मेट्रोचं जाळ विणलं. याउलट मुंबई आमची असा उठता बसता ध्यास करणाऱ्यांनी काय दिलं? दरवर्षी पावसात तुंबणारी मुंबई, खड्डे, अनधिकृत बांधकाम व ते पडल्याने जाणारे जीव,” अशी टीका केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलीय.

रेल्वे रुळांवर पाणी, लोकल वाहतुकीवर परिणाम

काल दिवसभर रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने संध्याकाळनंतर चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आजही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या एक तासापासून पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर मिठी नदीच्या पाण्यामुळे सायन आणि कुर्ल्याचे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. दादरचे रेल्वे रुळावरही पाणीच पाणी झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चुनाभट्टीतही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने हर्बर रेल्वेही अत्यंत धीम्यागतीने सुरू आहेत. त्यामुळे कामावर कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहे.

शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारवर आरोप

केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले असा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्यानंतर हिंदमाता, माटुंगा, सायन आणि दादर भागात पाणी साचत आहे. हिंदमाता येथे पाणी साचण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार आहेत. तीन महिन्यांपासून हिंदमाता येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज टनलची परवानगी मागितली जात होती. मात्र, ही परवानगी उशीरा आल्याने हे काम होऊ शकले नाही. परिणामी हिंदमाता परिसरात पाणी साचत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.

संबंधित बातम्या : 

Mumbai Rains : झोडपणे सुरूच … पावसामुळे मुंबईतील रस्ते पाण्यात, पाहा फोटो!

Mumbai Rains: मुंबईत समुद्राला उधाण, ढगांचा गडगडाट, धो-धो पावसाला सुरुवात

Keshav Upadhyay criticizes Shiv Sena over water logging in Mumbai

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.