रोहित पवार साडेचार तास बसून होते, अधिकारीही ताटकळले, पण मंत्री उदय सामंत आलेच नाहीत!; ‘त्या’ बैठकीचं काय झालं? वाचा…
Rohit Pawar on Karjat MIDC : रोहित पवार यांनी आधी भरपावसात आंदोलन केलं, बैठकीचं आश्वासन मिळालं पण बैठक झालीच नाही...; कर्जत MIDC बाबत काय घडतंय?

मुंबई | 26 जुलै 2023 : कर्जत जामखेड मतदार संघात MIDC प्रकल्प यावा यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपोषणही केलं. बैठकीचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र ती बैठक झालीच नाही. रोहित पवार यांनी या सगळ्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
रोहित पवार यांचं उपोषण
कर्जत तालुक्यातील पाटेवाडीमध्ये MIDC व्हावी यासाठी रोहित पवार आक्रमक झाले आहेत. जर ही MIDC झाली तर तरूणांच्या हाताला काम मिळेल. शिवाय त्या भागाचा विकास होईल, असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. त्यासाठी रोहित पवार यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं.
विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रोहित पवार यांनी उपोषण केलं. यावेळी त्यांनी ही एमआयडीसी व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली.
रोहित पवार यांच्या आंदोलनाची दखल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली. उदय सामंत यांनी रोहित पवार यांची उपोषण स्थळी भेट घेतली अन् उद्याच मिटिंग घेतो. उपोषण मागे घ्या, असा शब्द दिला. त्यानंतर रोहित पवार यांनीही उद्या आपण होणार आहे. त्यामुळे सध्यासाठी हे आंदोलन मागे घेतो. मात्र जर यावर तोडगा निघाला नाही तर माझ्या मतदारसंघातील तरूण आंदोलन करतील, असा इशारा दिला.
मात्र आयोजित करण्यात आलेली ही बैठक झालीच नाही. साडे चार तास बसून राहिलो. अधिकारीही ताटकळले होते. मात्र उदय सामंत आले नसल्याचं रोहित पवार म्हणालेत.
रोहित पवार यांनी ट्विट करत या सगळ्याची माहिती दिली आहे. आता पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे.
रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं
माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना काढण्याबाबत आज (मंगळवार) दुपारी २.३० वाजता बैठक घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनी दिल्यामुळं काल उपोषण मागे घेतलं. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत. त्यामुळं माझी तर फसवणूक झालीच पण माझ्या मतदारसंघाचीही फसवणूक करून संपूर्ण राज्यातील युवांविषयीचा दृष्टिकोन या सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिला. विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा अत्यंत निंदणीय प्रकार आहे.
तरीही माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की #MIDC ची अधिसूचना तातडीने काढून माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय द्या, अन्यथा माझ्या मतदारसंघातील युवांच्या आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता याच अधिवेशनात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
माझ्या मतदारसंघातील #MIDC ची अधिसूचना काढण्याबाबत आज (मंगळवार) दुपारी २.३० वाजता बैठक घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनी दिल्यामुळं काल उपोषण मागे घेतलं. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत. त्यामुळं… pic.twitter.com/CWozRYaGFi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 25, 2023
