पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 सदस्यी प्रभाग रचनेचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, 3 सदस्यीय प्रभाग रचनेच्या विरोधात राहिलेली काँग्रेस अद्यापही 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर अडून असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारनं महापालिका निवडणुकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा विचार करावा असं म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाण आज पुण्यात बोलत होते. (2 or 4 member ward structure suitable for municipal elections – Prithviraj Chavan)