Nagar Panchayat, ZP Election : 93 नगरपंचायतींसह, भंडारा-गोंदिया झेडपी, 195 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.

Nagar Panchayat, ZP Election : 93 नगरपंचायतींसह, भंडारा-गोंदिया झेडपी, 195 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 7:51 PM

मुंबई : राज्यातील एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका (Nagar Panchayat Election) जाहीर झाल्या होत्या. त्यातील पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, यवतमाळ- झरी- जाणणी, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (OBC Reservation) राखीव नव्हती. त्यामुळे तेथील सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.

उद्या रोजी मतदान होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे

>> ठाणे- मुरबाड व शहापूर >> रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित) >> रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे >> पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी >> सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ >> सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित) >> नाशिक- निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी धुळे- साक्री >> अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर >> जळगाव- बोदवड >> औरंगाबाद- सोयगाव >> जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित) >> परभणी- पालम >> बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी >> लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ >> उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु. >> नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर >> हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ >> अमरावती- भातकुली, तिवसा >> बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा >> यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव >> वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही >> वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर >> भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर >> गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी >> चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही >> गडचिरोली- अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा

जिल्हा परिषदा

भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10; तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठी उद्या मतदान होत आहे.

ग्रामपंचायती

विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान होईल.

महानगरपालिका

सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होईल.

इतर बातम्या :

‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…’ फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश

‘पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो’, नाना पटोलेंची सारवासारव, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.