‘पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो’, नाना पटोलेंची सारवासारव, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

'पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो', नाना पटोलेंची सारवासारव, भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नाना पटोले

या व्हिडीओमध्ये पटोले 'मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो' असं बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर आता पटोले यांनी या व्हिडीओबाबत सारवासारव केलीय. मी पंतप्रधान मोदींबाबत नाही तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 17, 2022 | 7:01 PM

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर जोरदार टीका करताना सातत्यानं पाहायला मिळतात. आता नाना पटोले यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पटोले ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’ असं बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ टीव्ही 9 मराठीने दाखवल्यानंतर आता पटोले यांनी या व्हिडीओबाबत सारवासारव केलीय. मी पंतप्रधान मोदींबाबत नाही तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत बोललो आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

नाना पटोलेंचं स्पष्टीकरण काय?

“त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. मी त्यांना सांगत होतो की घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्यावर ते वाक्य आहे. पंतप्रधान मोदींबद्दल ते वाक्य नाही. या प्रकरणाचा बाऊ केला जात असेल तर भाग वेगळा आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहा, त्यात लोकांच्या तक्ररीनंतर लोकांमध्ये मी बोललो आहे. मी कुठल्या भाषणात मी हे बोललो नाही. गावगुंडाची तक्रार लोक करत होते आणि त्यांना मी आश्वस्त करत होतो. या व्हिडीओत मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याबद्दल मी बोललो आहे”, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलंय.

पटोले व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाले?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर

‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत. त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळं काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखं त्यांचं वर्तन सुरु आहे. पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शाहांवर त्यांनी आरोप केला की त्याचाच हा कट आहे. काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही. त्यांनी जेव्हा नौटंकी म्हटलं त्यावेळी आम्ही राज्यभरात केसेस दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पण कुठल्याही पोलीस ठाण्यात केस दाखल होऊ शकली नाही. राणे साहेबांनी नितेश कुठे आहे हे माहिती असल्याचं वक्तव्य केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरावर नोटीस लावायला पोहोचले. राणे साहेब म्हणाले असतो तर एक थोबाडीत मारली असती, त्यावर त्यांना अटक केली. पण नाना पटोलेंना हात लावायची हिंमत नाही. कारण काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. सगळं खुर्चीभोवती सुरु आहे. भाजप हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा’, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

इतर बातम्या : 

शरद पवारांच्या मेट्रो पाहणीनंतर राजकारण जोरात! ‘यास भीती म्हणावी की संकुचित मनोवृत्ती?’ रोहित पवारांचा चंद्रकांतदादांना टोला

‘हिम्मत असेल तर गोव्याला एक मतदारसंघ लढवा, नुसती भाषणं कसली करता’, चंद्रकांत पाटलांचं संजय राऊतांना थेट आव्हान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें