शिवसेनेचा नागपुरातील बडा नेते राष्ट्रवादीत, मुंबईत हालचालींना वेग, माजी पदाधिकाऱ्याला तातडीचं बोलावणं

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 8:39 AM

शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जात आहे, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय, असा आरोप करत शेखर सावरबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता.

शिवसेनेचा नागपुरातील बडा नेते राष्ट्रवादीत, मुंबईत हालचालींना वेग, माजी पदाधिकाऱ्याला तातडीचं बोलावणं
उद्धव ठाकरे आणि शेखर सावरबांधे

नागपूर : शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे (Shekhar Sawarbandhe) राष्ट्रवादीत गेल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील शिवसेनेत असलेल्या असंतोषाची कारणं मुंबईहून मागवल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला तातडीने मुंबईत बोलावणं आल्याचीही माहिती आहे.

शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा?

शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याने सेनेत स्फोट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत नागपुरातील डझनभर जुन्या शिवसैनिकांनी शिवबंधन तोडलं. मराठी माणसांच्या शिवसेनेवर हिंदी भाषिकांचा कब्जा होत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

“आता सेनेत राहणं शक्य नाही”

शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जात आहे, पण जुन्या शिवसैनिकांना डावललं जातंय, असा आरोप करत शेखर सावरबांधे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी जवळपास 20 वर्षे शिवसेनेत राहिलो. पण आता पक्षाचं चित्र पाहता सेनेत राहणं शक्य नाही, असंही ते म्हणाले होते. नागपूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

20 वर्षे सेनेत राहिलेल्या नेत्यावर पक्ष सोडण्याची वेळ

शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती. परंतु “आपले नेते खा. गजानन किर्तीकर यांच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, मग आपण सेनेत राहून काय करायचं?” असा सवाल उपस्थित करुन त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने सेनेला मोठा धक्का बसलेला आहे.

विदर्भात शिवसेना खिळखिळी

विदर्भात शिवसेनेची ताकद कमी आहे. शिवसेना पक्षनेतृत्व विदर्भात जास्त लक्ष देत नाही, असा स्थानिक शिवसैनिकांचा सातत्याने आरोप असतो. आता नागपूर महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशातच सावरबांधे यांच्या धक्कातंत्राने शिवसेना बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

कोण आहेत शेखर सावरबांधे?

शेखर सावरबांधे हे नागपूरचे माजी उपमहापौर आहेत शिवसेनेचे माजी नागपूर जिल्हाप्रमुख शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती विदर्भातल्या शिवसेनेवर त्यांची मजबूत पकड होती

शिवसेनेला दुसरा मोठा धक्का

दोन महिन्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गेल्या महिन्यात अशोक शिंदे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. आता शेखर सावरबांधे यांनी सेना सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार पडलं आहे.

हे ही वाचा :

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार, पक्षनेतृत्वावर आरोप करत बड्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

शिवबंधन सोडलेल्या माजी राज्यमंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Ashish Jaiswal | बाहरेच्यांना मंत्रिपद मिळतं, 30 वर्ष सेनेत पण सन्मान नाही मिळाला, फार दु:ख होतं

काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI