मुंबई : माध्यमं, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते नाना पटोले यांनी केलीय. माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पटोले म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल अनंत चतुर्दशी असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाणिवपूर्वक स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही पटोले यांनी केलीय. (Nana Patole accuses BJP of blackmailing, Patole’s warning to expose BJP leaders’ scams)