पुणे महापालिकेसाठी सेना-राष्ट्रवादीची आघाडी, पटोले म्हणतात “पाठून वार करण्याची भूमिका नाही”

संजय राऊत यांनी जे सांगितलं ते स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले. (Nana Patole Shivsena NCP alliance )

पुणे महापालिकेसाठी सेना-राष्ट्रवादीची आघाडी, पटोले म्हणतात "पाठून वार करण्याची भूमिका नाही"
नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील

पुणे : स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घेत पुण्यात महाविकास आघाडी करण्याबाबत निर्णय घेऊ, मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते, पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही, असं काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुणे महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली. (Nana Patole reaction on Shivsena NCP alliance for Pune Municipal Corporation Election)

“पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही”

आमची भूमिका स्पष्ट आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घेत निर्णय घेऊ. मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते, पाठून वार करण्याची आमची भूमिका नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मिळून निर्णय घेऊ. संजय राऊत यांनी जे सांगितलं ते स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.

“भाजपला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी”

राज्यात जी महाविकास आघाडी आहे, ती भाजपला थांबवण्यासाठी आहे. भाजप देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवत आहे. भाजप देशाला तोडण्याचं काम करत आहे, आम्ही आघाडीसोबत आहोत, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती.

 संजय राऊत काय म्हणाले?

पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचं संजय राऊत म्हणाले. एकत्र लढणं हे सत्ता परिवर्तनाच्या दिशेने टाकलेलं पाऊल असतं. राज्यात महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी करावी असा विचार करण्यात येईल. निवडणुका एकत्र कशा लढता येतील यावर आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. एकत्र निवडणूक लढली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सत्ता काबीज करण्यासाठी मदत होईल, असंही राऊत म्हणाले. (Nana Patole reaction on Shivsena NCP alliance for Pune Municipal Corporation Election)

आयसोलेशननंतर सेलिब्रेशन, पटोले म्हणतात…

“मी परवा भंडाऱ्यात होतो, सध्या कोव्हिड सुरु असल्याने माझी जबाबदारी आहे, की मी स्वतःला तपासून घ्यावं. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आयसोलेशनमध्ये राहिलो. तीन तासात माझा रिपोर्ट आला. मला काही त्रास नाही, म्हणून मी पुन्हा लोकांमध्ये आलो.” असं नाना पटोलेंनी सांगितलं.

देशामध्ये फक्त सगळे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच आहेत, अशाप्रकारे ते वागतात. भाजपचा स्थानिक अध्यक्ष रुबल शेख यांच्यावर पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. घराची झडती झाली तेव्हा कळलं की तो बांगलादेशी आहे. सीएए इतरांसाठी आणि भाजपचे कार्यकर्ते आता सीएए कायदा मोडतात, तर अमित शाहांना देशाच्या गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे की या पद्धतीने बांगलादेशींना भाजपचा उत्तर मुंबई अध्यक्ष केल्यानंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला का? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.

संबंधित बातम्या :

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं, संजय राऊतांकडून मोठी घोषणा

(Nana Patole reaction on Shivsena NCP alliance for Pune Municipal Corporation Election)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI