Narayan Rane Arrest : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक, रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहे.

Narayan Rane Arrest : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक, रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता
narayan rane


संगमेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्यानंतर राणे यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राणेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन नाशिककडे निघाले. (Union Minister Narayan Rane arrested by ratnagiri Police)

अटकेनंतरची प्रक्रिया कशी असेल?

राणेंवर कारवाई होईल असं वाटतं नाही, पण त्यांचं वक्तव्य हे सुसंस्कृत नाही. हा सगळा राजकारणाचा भाग आहे. संविधानिक नाही. जन आशिर्वाद यात्रेतील वक्तव्य हे राजकारण आणि त्यानंतरची कारवाईही राजकारणच आहे. हा लोकशाहीचा पराभव आहे. राणेंना रत्नागिरी कोर्टातच न्यावं लागेल. नारायण राणेंविरोधातील गुन्हा सिद्ध होणं फार अवघड आहे, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या :

नारायण राणेंना अटक पण प्रकृती बिघडली, बीपी, साखरेचे प्रमाण वाढले, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

नारायण राणेंना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Union Minister Narayan Rane arrested by ratnagiri Police

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI