AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’; राणेंचा उद्धव ठाकरे- आदित्य यांच्यावर नाव न घेता ‘प्रहार’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील कलगीतुरा पुन्हा एकदा रंगला आहे. (narayan rane slams cm uddhav thackeray)

'अब तो एक ढुंढो हजार मिलते है'; राणेंचा उद्धव ठाकरे- आदित्य यांच्यावर नाव न घेता 'प्रहार'
भाजप नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Mar 07, 2021 | 8:30 AM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील कलगीतुरा पुन्हा एकदा रंगला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरून राणेंना डिवचल्यानंतर राणेंनीही पलटवार करत मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. आता राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता प्रहार केले आहेत. (narayan rane slams cm uddhav thackeray)

नारायण राणे यांच्या दैनिक ‘प्रहार’मध्ये पान क्रमांक एकवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा छापण्यात आला असून त्यावर राणेंनी भाष्य केलं आहे. ‘बाळासाहेब, आपण व्यंगचित्रं करण्याचे काम कमी केलेत. या प्रश्नास उत्तर देताना बाळासाहेब खंत व्यक्त करत म्हणत, व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे राहिले नाहीत. त्या उंचीचे व्यक्तिमत्त्व नजरेस पडत नाही. दर्जेदार विषय गवसत नाहीत. विकृत आणि विदूषक कमी झाले. आज बाळासाहेब असते तर… उत्सुफूर्तपणे कुंचला उचलला असता अन् दिवसागणिक शेकडो व्यंगचित्रं केली असती… अब तो एक ढुंढो हजार मिलते है, और तो घर में ही दो दो बसते है’, अशी खोचक टीका राणेंनी केली आहे. राणेंनी बाळासाहेबांच्याच विधानाचा वापर करून मुख्यमंत्र्यांवर हा बोचरा वार केला आहे.

आज बाळासाहेब असते तर…

आजच्या दैनिक ‘प्रहार’मधील पहिल्या पानावर ही टीक करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रं काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असं लिहिलं आहे. वर फोटोला ‘आज बाळासाहेब असते तर…’ अशी कॅप्शन दिली आहे आणि सर्वात शेवटी ‘खा. नारायण राणे यांच्या संग्रहातून’ असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंची टीका

दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यावरून राणेंवर नाव न घेता टीका केली होती. आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही मागणी करत नाही. तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितलं. तुम्ही स्वत:साठी काही मागितलं असतं. पण तुम्ही ते केलं नाही. काही लोकं असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही स्वत:साठी काही मागितलं नाही, असा टोला त्यांनी राणे यांना नाव न घेता लगावला होता.

राणेंचा पलटवार

मुख्यमंत्र्यांनी टीका केल्यानंतर राणेंनीही त्यावर पलटवार करून कालच मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलं आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशी खोचक टीका राणे यांनी होती. (narayan rane slams cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

शरद पवारांचा कुटुंबियांसोबत डिनर टाईम; फोटो व्हायरल!

महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं, नाही तर लोक स्वत:साठी मागतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

(narayan rane slams cm uddhav thackeray)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...