महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

द्धव ठाकरे एक वर्ष आमदार आणि मंत्र्यांनाच भेटले नाहीत. जनतेला तर त्यांचे दर्शनही झाले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. | Narayan Rane

महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

सिंधुदुर्ग: आपण मंत्रालयात स्वत: गाडी चालवत जातो, असे उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत सांगितले. पण महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय, अशा बोचऱ्या शब्दांत भाजप खासदार नारायण राणे (Naryan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (CM Uddhav Thackeray)  वार केला. ज्ञान नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला म्हणून महाराष्ट्र पिछाडीकडे चालला आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही, अनुभवला नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. (BJP MP Narayan Rane slams CM Uddhav Thackeray)

नारायण राणे यांनी शुक्रवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. मुख्यमंत्री आता शिवसैनिकांना भेटणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे एक वर्ष आमदार आणि मंत्र्यांनाच भेटले नाहीत. जनतेला तर त्यांचे दर्शनही झाले नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनाही लक्ष्य केले. संजय राऊत यांना काहीतरी पदरात पाडून घ्यायचे आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांची सारखी मुलाखत घेतात आणि उत्तरंही स्वत:च देतात, अशी खोचक टिप्पणी नारायण राणे यांनी केली होती.

‘तुम्ही ड्रायव्हिंग का करताय?, उद्धव ठाकरे म्हणाले…’

माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती दडपून ठेवायचं, किती बंधनं ठेवायची. मग प्रत्येकवेळी त्यांची कोरोना टेस्ट करा. तर हा त्रास नको म्हणून मी ती सुरुवात केली आणि आता ड्रायव्हिंग सुरूच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुलाखतीत सांगितले होते.

मी गाडी चालवतच राहीन. ठीक आहे, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत गाडीत नुसता बसून प्रवास करेन. मुख्यमंत्रिपद त्याची प्रभावळ काही जण मानतात, पण तसं काही नाहीच. मुख्यमंत्रीसुद्धा माणूसच असतो. पंतप्रधानही माणूसच असतो. फक्त आपल्यातली माणुसकी कुणी घालवू नये, जाऊ देऊ नये, हे ज्याने त्याने पाहायला पाहिजे. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यातली, पंतप्रधानातली माणुसकी मरेल त्या दिवशी तो पंतप्रधान किंवा तो मुख्यमंत्री कामाचा नाही. जमिनीवर आहेत, क्लचवर आहेत, ब्रेकवर आहेत आणि एक्सिलेटरवरही आहेत आणि हातात स्टेअरिंगपण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

तुम्ही ड्रायव्हिंग का करताय?, उद्धव ठाकरे म्हणतात…

तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

(BJP MP Narayan Rane slams CM Uddhav Thackeray)

Published On - 8:35 pm, Fri, 27 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI