AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’, नारायण राणेंचा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टोला

केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी केली आहे (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).

'स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील', नारायण राणेंचा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टोला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 18, 2020 | 4:29 PM
Share

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विटरवर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (18 नोव्हेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारने केंद्राला शेतकऱ्यांना मदतीसाठी तीन पत्र पाठवल्याची माहिती दिली. दरम्यान, केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी केली आहे (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).

“राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा, अशी मागणी करतील”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला तीनवेळा पत्र लिहिले. केंद्र सरकारने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पथक पाठवा, अशी विनंती पत्राद्वारे केली. पण भाजपवाले म्हणतात केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच आला नाही. त्यामुळे आम्ही आणखी एक पत्र केंद्राला पाठवणार आहोत. भाजप लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे. शेतकऱ्यांची मतं मिळाली म्हणून तुम्ही केंद्रात आहात. मात्र त्यांनाच मदत दिली जात नाही “, असं विजय वडेट्टीवर म्हणाले होते.

महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं संकट असताना केंद्र सरकार राज्यासोबत दुजाभाव करत असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (18 नोव्हेंबर) केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मते दिली नाहीत का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (bjp) खासदार राज्यात निवडून आले. राज्यातही जनतेनं त्यांचे 105 आमदार निवडून दिले. पण तरीही भाजपने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरण अवलंबल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा :

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

पुणे पदवीधर निवडणूक स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...