सिंधुदुर्गातील कट्टर राणे समर्थकाचे निधन, कोरोना संसर्गानंतर अखेरचा श्वास

मधूसुदन बांदिवडेकर यांनी नारायण राणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी केला

सिंधुदुर्गातील कट्टर राणे समर्थकाचे निधन, कोरोना संसर्गानंतर अखेरचा श्वास

सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधूसुदन बांदिवडेकर यांचे निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरु असतानाच बांदिवडेकर यांची प्राणज्योत मालवली. (Narayan Rane Supporter Madhusudan Bandivadekar dies of COVID in Sindhudurg)

सुदन बांदिवडेकर म्हणून ते समर्थकांमध्ये लोकप्रिय होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कणकवली तालुक्यात मधूसुदन बांदिवडेकर शिवसेनेचे पहिले सभापती ठरले होते.

कट्टर राणे समर्थक मधूसुदन बांदिवडेकर यांची ओळख होती. नारायण राणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या-त्या पक्षात असताना त्यांनी विविध पदे भूषवली होती. सध्या ते भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.

शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व भाजप पक्षाची त्यांनी जिल्ह्यातील विविध पदे भूषविली होती. सध्या ते भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.

सुदन बांदिवडेकर यांचे वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी निधन झाले. गेले काही दिवस ते ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मात्र उपचार सुरु असतानाच बांदिवडेकर यांची प्राणज्योत मालवली. (Narayan Rane Supporter Madhusudan Bandivadekar dies of COVID in Sindhudurg)

शिवसेनेच्या महिला आघाडीची जनता कर्फ्यूची मागणी

दरम्यान, सिंधुदुर्गात 14 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुन्हा एकदा 14 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 17 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सण-उत्सव नसल्यामुळे या कालावधीतच हा जनता कर्फ्यू घ्यावा अशी मागणी आहे.

ओरोस शहर व्यापारी संघटनेच्या बैठकीत 17 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 8 दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जिल्हा मुख्यालय असलेली ओरोस बाजारपेठ आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून पूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी संघटनेकडून करण्यात आले आहे.

(Narayan Rane Supporter Madhusudan Bandivadekar dies of COVID in Sindhudurg)

Published On - 8:15 am, Wed, 16 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI