Swearing-in Ceremony Live : मोदी-राजनाथ यांच्यानंतर अमित शाहांनी शपथ घेतली

Narendra Modi Oath Ceremony Live :  नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (Prime Minister) शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबत 50 जण शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदींच्या शपथविधीचा भव्य-दिव्य सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जवळपास सहा हजार पाहुणे उपस्थित राहतील. राजकारण, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, उद्योग, …

Swearing-in Ceremony Live :  मोदी-राजनाथ यांच्यानंतर अमित शाहांनी शपथ घेतली

Narendra Modi Oath Ceremony Live :  नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (Prime Minister) शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबत 50 जण शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदींच्या शपथविधीचा भव्य-दिव्य सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जवळपास सहा हजार पाहुणे उपस्थित राहतील. राजकारण, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, उद्योग, संरक्षण, पर्यावरण यासह सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवर या शपथविधी सोहळ्याला हजर आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याशिवाय 14 देशांचे प्रमुखही या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचं सरकार असणारे मोदी तिसरे पंतप्रधान आहेत. 543 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत यावेळी एकट्या भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत, तर एनडीएच्या खात्यात 353 जागा आहेत.

LIVE UPDATES 

प्रल्हाद जोशी यांचा शपथविधी

मुक्तार अब्बास नख्वी यांचा शपथविधी

धर्मेंद्र प्रधान यांचा शपथविधी

हर्षवर्धन यांचा शपथविधी

पियुष गोयल यांचा शपथविधी

अर्जुन मुंडा यांचा शपथविधी

प्रकाश जावडेकर यांचा शपथविधी

स्मृती इराणी यांचा शपथविधी

रमेश पोखरिया निशंक – कॅबिनेट मंत्री

रमेश पोखरियाल (भाजप)

एस जयशंकर -कॅबिनेट मंत्री 

एस. जयशंकर (माजी परराष्ट्र सचिव)

थावरचंद गहलोत – कॅबिनेट मंत्री

हरसिमरत कौर बादल यांचा शपथविधी

हरसिमरत कौर (शिअद)

नरेंद्रसिंह तोमर यांचा शपथविधी

रामविलास पासवान यांचा शपथविधी

रवीशंकर प्रसाद यांचा शपथविधी

निर्मला सीतारमण यांचा शपथविधी

सदानंद गौडा यांचा शपथविधी

नितीन गडकरी यांचा शपथविधी

मोदी-राजनाथ यांच्यानंतर अमित शाह यांनी शपथ घेतली

राजनाथ सिंह यांचा शपथविधी

Picture

मोदींनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली

30/05/2019,7:06PM
Picture

सुषमा स्वराज पाहुण्यांच्या रांगेत

सुषमा स्वराज पाहुण्यांच्या रांगेत बसल्या, मंत्रिपदाची शक्यता मावळली

30/05/2019,6:54PM
Picture

राहुल गांधी-सोनियांची हजेरी

30/05/2019,6:40PM

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची शपथविधीला हजेरी

Picture

अमित शाह गडकरी-राजनाथ यांच्या मध्ये

राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या मध्ये अमित शाह, मोदी, राजनाथ यांच्यानंतर अमित शाह यांचा शपथविधी शक्य

30/05/2019,6:22PM
Picture

अमित शाह नवे अर्थमंत्री?

30/05/2019,5:13PM
Picture

अरविंद सावंत यांना फोनवर फोन

अमित शाह यांनी फोन केला होता का, उद्धव ठाकरेंकडून फोन करुन अरविंद सावंत यांना विचारणा, तर अमित शाहांनी अरविंद सावंत यांना PMO ला बोलावलं

30/05/2019,1:02PM
Picture

अरविंद सावंत यांना फोन

अमित शाह यांचा अरविंद सावंत यांना फोन, PMO ऑफिसला बोलावले.

30/05/2019,12:40PM
Picture

मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

30/05/2019,12:41PM
Picture

दानवेंचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत

रावसाहेब दानवे यांचं नाव केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत

30/05/2019,12:41PM
Picture

रामदास आठवले यांना अखेर राज्यमंत्री पद निश्चित

30/05/2019,12:24PM
Picture

शपथविधीला कोण कोण जाणार नाहीत?

30/05/2019,12:42PM
Picture

मोदींसह 50 मंत्री शपथ घेणार

पंतप्रधान मोदींसह 50 जण आज शपथ घेणार, मागील वेळी 2014 मध्ये 46 जणांचा शपथविधी, यंदा चार जणांची नावं वाढवली

30/05/2019,12:10PM
Picture

सेना खासदारांमध्ये गटबाजी

अरविंद सावंत यांना मंत्रिपद दिल्यामुळे शिवसेनेत दोन गट, ग्रामीण विरुद्ध शहरी भागातील खासदार अशी गटबाजी, शहरी भागातील खासदाराला संधी दिल्यामुळे ग्रामीण भागातील खासदार नाराज, भावना गवळी, प्रतापराव जाधव यांचा ज्येष्ठतेप्रमाणे दावा

30/05/2019,12:05PM
Picture

मोदी-शाह यांची बैठक सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची 7, लोककल्याण मार्ग येथे बैठक सुरु

30/05/2019,11:12AM
Picture

चहापाणी रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाव्य मंत्र्यांचा चहापाणी रद्द, मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब नसल्याने निर्णय, पंतप्रधान निवासस्थानाहून दहा वाजता संभाव्या मंत्र्यांना फोन करुन शपथविधीची माहिती देणार असल्याची सूत्रांची माहिती

30/05/2019,9:25AM
Picture

भूतानचे पंतप्रधान भारतात दाखल

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भूतानचे पंतप्रधान डॉ. लोतेय त्शेरिंग भारतात दाखल, परराष्ट्र सचिव विजय गोखलेंकडून डॉ. त्शेरिंग यांचं स्वागत

30/05/2019,8:28AM

Picture

वॉर मेमोरियल येथे जाऊन मोदींकडून शहिदांना अभिवादन

30/05/2019,8:19AM
Picture

VIDEO : मोदींकडून गांधीजींना आदरांजली

30/05/2019,8:16AM
Picture

14 देशांच्या प्रमुखांची उपस्थिती

राष्ट्रपती भवनात आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जातंय. या कार्यक्रमात सहा हजार पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. शपथविधीमध्ये BIMSTEC समुहातील देशांचे प्रमुख, शांघाय संघटनेचे अध्यक्ष (SCO), किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि मॉरिशिअसचे पंतप्रधान उपस्थित राहतील. एकूण 14 देशांच्या प्रमुखांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती असेल.

30/05/2019,8:10AM
Picture

देशातील कोण कोण नेते येणार?

राहुल गांधी, मनमोहन सिंह, सोनिया गांधी यांसह अनेक नेत्यांची उपस्थिती असेल. टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जींनी कार्यक्रमाला येणार नसल्याचं कळवलंय. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण पाठवण्यात आलंय.

30/05/2019,8:10AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *