प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं…

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती का तुटली?, हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. याच उत्तर असदुद्दीन औवसी यांनी दिलंय. पाहा काय म्हणाले...

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं...
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 12:10 PM

नाशिक : उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली. पण काही दिवसांआधी ही युती तुटली. पण ही युती नेमकी का तुटली याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चा होत असते. त्यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केलंय.

युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा मी कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. ती मी आता कसं सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.

लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरही ओवैसी बोललेत. भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा बेकायदेशीर कायदा बनवण्यात आला आहे, असं म्हणत औवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे.

लव्ह जिहाद म्हणतात पण भाजपमध्ये असे किती लोकं आहेत की त्यांनी अशी लग्न केली आहेत. कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय ? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादी नजरेतून बघणं योग्य नाही. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार ? धर्मपरिवर्तनबाबत जुना कायदा आहे. ज्यांना जे आवडतंय ते करूद्या. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर बोला, असं औवैसी म्हणालेत.

अहमदनगरचं नामांतर करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आलाय. त्यावर विचारलं असता, तरूणांच्या हाताला काम द्या. नोकरीच्या संधी वाढवा. महागाई कमी करा. तुम्हाला फक्त नावाचं पडलंय. नामांतरापेक्षा कामाच्या गोष्टींवर बोला, असं ओवैसी म्हणालेत.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर टीका केली जातेय. त्यावर विचारलं असता ओवैसी यांनी उत्तर देणं टाळलं. याविषयी अजितदादांनाच विचारा, असं ते म्हणालेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.