AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची खेळी

गेले काही दिवस राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेवरुन सत्तासंघर्ष सुरु आहे. याच दरम्यान आता नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

नाशिकचे नगरसेवक अज्ञातस्थळी, फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपची खेळी
| Edited By: | Updated on: Nov 16, 2019 | 5:51 PM
Share

नाशिक : गेले काही दिवस राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेवरुन सत्तासंघर्ष सुरु आहे. याच दरम्यान आता नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या काही नगरसेवकांची (nashik bjp corporator picnic) फोडाफोडी होऊ शकते. या भीतीने भाजपने आपले नगरसेवक (nashik bjp corporator picnic) अज्ञातस्थळी सहलीला रवाना केले आहेत. पण सात नगरसेवकांनी या सहलीला जाण्यास नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सहलीला जाण्यास नकार दिलेले सात नगरसेवक हे भाजपमधून राष्ट्रवादीमार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे समर्थक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. सात नगरसेवक अनुपस्थित असल्याने भाजपच्या गोटातही अस्वस्थता आहे. मात्र भाजपचे सर्व नगरसेवक सहलीला येतील असा दावा भाजपचे गटनेते करत आहेत.

नाशिक महानगरपालिकेत भाजपला बहुमत आहे. पण असे असतानाही यंदाची महपौरपदाची निवडणूक भाजपसाठी जड जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्कारायला तयार नाही.

शहराच्या तीन मतदारसंघातून नगरसेवक बसमध्ये आणण्याची जवाबदारी स्थानिक आमदारांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे 85 वर्षाच्या सर्वात वयोवृद्ध नगरसेविका भिकाबाई बागुलही या सहलीला रवाना झाल्या आहेत.

दरम्यान, भाजपचे पूर्व नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचं पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली. पण पराभूत झाल्याने अवघ्या आठ दिवसात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांचा नाशिक पालिकेत प्रभाव आहे, ते भाजपचे नगरसेवक फोडू शकतात, असा विश्वास शिवसेनेला आहे. त्याचा उपयोग करुन शिवसेना महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि मनसे यांच्या साथीने शिवसेना आपला महापौर बसवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे.

नाशिक महापालिकेतील सद्यपरिस्थिती

एकूण जागा 122

भाजप (स्पष्ट बहुमत) : 66 होते आता 65

(सरोज अहिरेंचा राजीनामा, देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी आमदार म्हणून निवडणूक जिंकली)

शिवसेना : 34

(1 सदस्य दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसेमधून विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला.)

काँग्रेस : 7

राष्ट्रवादी काँग्रेस : 7

मनसे : 6

रिपाई : 1

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.