नवी मुंबईत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादीला 40 तर शिवसेनेला…

विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांनतर आता सर्वांचे लक्ष नवी मुंबई महापालिका निवडणुकांकडे (Navi Mumbai municipal corporation election) लागलं आहे.

नवी मुंबईत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादीला 40 तर शिवसेनेला...

नवी मुंबई : विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांनतर आता सर्वांचे लक्ष नवी मुंबई महापालिका निवडणुकांकडे (Navi Mumbai municipal corporation election) लागलं आहे. या निवडणुका एप्रिलमध्ये होणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपचा फॉर्म्युलाही ठरलेला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या 111 प्रभागांपैकी शिवसेना 50, राष्ट्रवादी 40 आणि शिल्लक 21 प्रभाग काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यात 14 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात (Navi Mumbai municipal corporation election) रस्सीखेच सुरू आहे.

महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. अगोदर बहुसदस्यीय पद्धतीने ठरलेली ही निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी चार प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याठी शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जबाबदारी सोपविली आहे, तर शिवसेनेच्या वतीने उपनेते विजय नाहटा बाजू सांभाळत आहे. काँग्रेसच्या वतीने स्थानिक अनिल कौशिक यांच्याकडे नवी मुंबईतील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकत माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या दरम्यान नाईक यांनी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक फोडत नवी मुंबई महानगर पालिकेतील राष्ट्रवादीचे सरकारही पाडले होते. त्यामुळे गणेश नाईक यांना महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

Published On - 8:10 pm, Thu, 9 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI