इम्रान खान यांना ‘बडे भाई’ म्हटल्याने सिद्धू अडचणीत, स्पष्टीकरणात म्हणाले, हा मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचा प्रकार!

जनरल बाजवा आणि इम्रान खान हे दोघेही नवज्योत सिंह सिद्धू यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याची टीका त्यांच्यावर नेहमीच होते. मात्र आता इम्रान खान यांना 'बडे भाई' म्हणून संबोधल्यानंतर संपूर्ण देशवासियांसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे.

इम्रान खान यांना 'बडे भाई' म्हटल्याने सिद्धू अडचणीत, स्पष्टीकरणात म्हणाले, हा मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचा प्रकार!
नवज्योत सिंह सिध्दू
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 5:42 PM

चंदीगडः पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी शनिवारी पाकिस्तानातील कर्तारपूरला पोहोचले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे भावूक झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना ‘बडे भाई’ अशी उपमा दिली. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जनरल बाजवा आणि इम्रान खान हे दोघेही नवज्योत सिंह सिद्धू यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याची टीका त्यांच्यावर नेहमीच होते. मात्र आता इम्रान खान यांना ‘बडे भाई’ म्हणून संबोधल्यानंतर संपूर्ण देशवासियांसाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे.

मूळ मुद्दा बाजूला ठेवून टीका- सिद्धू

मात्र या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना नवज्योत सिंह सिद्धू म्हणाले, हल्ली लोक कोणत्याही गोष्टीचा बाऊ करतात. भाजपला काय टीका करायची आहे, ती करू द्या. मी फक्त गुरुद्वाऱ्यात दर्शनासाठी गेलो होतो. याआधीही अशी टीका झाली आहे. मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचे हे प्रयत्न आहेत.

सिद्धू यांचे कोणते वक्तव्य होते?

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ‘बडे भाई’ म्हणाले. पाकिस्तानमध्ये कर्तारपूर कॉरिडोअरच्या सीईओंसोबत चर्चा करताना हे वक्तव्य केले. पंजाबच्या इतर कॅबिनेट मंत्र्यांसोबत कर्तारपूर साहिब गुरुद्वाऱ्यात दर्शन घेण्यासाठी ते कर्तारपूरमध्ये गेले होते. तेथेही पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर आपले खूप प्रेम आहे, असे वक्तव्यही सिद्धू यांनी केले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली.

भाजपची काय प्रतिक्रिया?

नवज्योत सिंह सिद्धू यांच्या या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ” काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानला जाऊन इम्रान खान किंवा पाकिस्तानची स्तुती करणार नाहीत, असे होऊ शकत नाही. इम्रान खान यांना ‘बडे भाई’ संबोधणे ही कोट्यवमधी भारतीयांसाठी मोठी चिंतेची बाब आहे.

पंजाबमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नवज्योत सिंह सिद्धू यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरू शकते. नवज्योत सिंह सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे राजकारणात येण्यापूर्वी क्रिकेटपटू होते आणि आपापल्या देशाकडून खेळलेही आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीचे संबंध स्वाभाविक आहेत. मात्र इम्रान खान सध्या भारतात दहशतवादी कारवाया वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे त्याला ‘बडा भाई’ म्हणणं हा राजकीय मुद्दा होऊ शकतो. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर हे आधीपासूनच सिद्धू यांच्याविरोधात टीका करत असतात. इम्रान खान आणि बाजवा यांच्याशी सिद्धू यांचे जवळचे संबंध आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपशी हातमिळवणी करणार आहेत.

इतर बातम्या-

‘ते निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’, चंदक्रांत पाटलांचा राऊतांवर पलटवार

बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यापूर्वी माईक टायसनला करावा लागायचा महिलांशी सेक्स, ड्रायव्हरचा खळबळजनक दावा

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.