Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आरोप सिद्ध झाल्याशिवाय नवाब मलिकांचा राजीनामा नाही’, जयंत पाटील यांचा पुनरुच्चार, भाजपवर निशाणा

मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपनं जोरदार आंदोलनही केलंय. अशावेळी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

'आरोप सिद्ध झाल्याशिवाय नवाब मलिकांचा राजीनामा नाही', जयंत पाटील यांचा पुनरुच्चार, भाजपवर निशाणा
नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं जयंत पाटील यांच्याकडून स्पष्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 6:11 PM

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिन व्यवहार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणी मलिक यांना ईडीकडून अटकही करण्यात आली. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. अशावेळी भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपनं जोरदार आंदोलनही केलंय. अशावेळी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशन सुरू झाल्यापासून करत आहेत. परंतु मलिक यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय यंत्रणेचा वापर करून कारवाई केली जाते. विरोधक अशा कारवाईनंतर मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत, यावर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडली.

‘गुन्हा सिद्ध झाला तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे समजू शकतो’

कोणत्या मंत्र्याला तुरुंगात ठेऊन त्यांचे राजीनामे घ्यायचे हे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. एखादा गुन्हा सिद्ध झाला तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे समजू शकतो. अनिल देशमुख यांच्याबाबत त्यांनी राजीनामा स्वत:हून दिला. त्यानंतर देशमुखांवर अनेक गुन्हे लावण्यात आले. 95 वेळा त्यांच्या विविध निवास ठिकाणी छापे मारणे सुरू आहे. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत ही धारणा सर्वांची झाली आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती तर ते समजूत घालू शकले असते, पण त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना उलट माहिती देऊन स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला हवी होती. त्यामुळे त्यांचे राजीनामे आम्ही घेत बसणे योग्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

इतर बातम्या : 

‘परमेश्वराने मला दूरदृष्टी दिली आणि मी भाजपमध्ये आलो’, खासदार सुजय विखे-पाटलांची काँग्रेसवर टोलेबाजी

Video : आमदाराच्या गाडीनं भाजप कार्यकर्त्यांना चिरडलं, लोकांनी आमदारालाही जखमी होईपर्यंत मारलं

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.