पवारांवर ईडीच्या कारवाईनंतर बारामतीत बंदची हाक

भाजप सरकार (BJP Government) सूडबुद्धीने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पवारांवर ईडीच्या कारवाईनंतर बारामतीत बंदची हाक

पुणे: भाजप सरकार (BJP Government) सूडबुद्धीने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याविरोधात बुधवारी (25 सप्टेंबर) बारामती बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईचं (ED action against Sharad Pawar) प्रकरण ऐन विधानसभा निवडणुकींच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर तापण्याची चिन्ह आहे. बुधवारी सकाळी 10:00 वाजता बारामतीतील (Baramati) शारदा प्रांगणात नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल (money laundering sharad pawar) केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

शरद पवारांनी यावर बोलताना राज्यभरात मला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ही कारवाई झाल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो तेथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती, तरच मला आश्चर्य वाटलं असतं. निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई होत आहे. महाराष्टातील जनतेसमोर हे आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत उत्तर मिळेल.”

सहकारी संस्थांना त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना कर्ज देण्याची जबाबदारी संबंधित बँक संचालकांनी घेतली. त्यामुळे बँकेचं नुकसान झालं, त्याकाळात जे संचालक आले ते शरद पवार यांच्या विचाराचे होते. त्यांच्या संमतीने हे निर्णय झाले असतील असं सांगितलं जात आहे. मी राज्यातील कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळावर नाही. संचालक मंडळाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही, असंही पवारांनी नमूद केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *