AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढता वाढता वाढे.. महायुतीतला तिढा संपेचना ! अजितदादांच्या गटाचा 5 मतदारसंघावर दावा, कोणत्या जागांचा समावेश ?

आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील पाच जागा आम्हाला द्या, अशी मागणी केली आहे. मराठवाड्यात दावा केलेल्या या मतदारसंघावर अजित पवार गटातील एकही आमदार नाही.

वाढता वाढता वाढे.. महायुतीतला तिढा संपेचना ! अजितदादांच्या गटाचा 5 मतदारसंघावर दावा, कोणत्या जागांचा समावेश ?
| Updated on: Sep 19, 2024 | 12:05 PM
Share

Ajit Pawar Demand 5 Seats : सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता महायुतीत कोणत्या पक्षांना कोणत्या जागा द्यायच्या यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचे बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील महत्त्वाच्या पाच जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 जागा मिळणार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने 60 पेक्षा जास्त जागा हव्यात असा दावा केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील पाच जागा आम्हाला द्या, अशी मागणी केली आहे. मराठवाड्यात दावा केलेल्या या मतदारसंघावर अजित पवार गटातील एकही आमदार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील पाथरी, जालना शहर, घनसांवागी, गंगापूर, उसमानाबाद-कळंब या मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाने दावा केलेल्या मतदारसंघांवर त्यांचा विद्यमान एकही आमदार नाही. यातील दोन जागांवर काँग्रेस, एका जागेवर शरद पवार गट, एका जागेवर भाजप आणि एका जागेवर ठाकरे गटाचे आमदार आहेत.

या 5 मतदार संघातील विद्यमान आमदार

पाथरी – सुरेश वरपुडकर (काँग्रेस) जालना शहर – कैलास गोरट्याल (काँग्रेस) घनसांवागी – राजेश टोपे (NCP SP) गंगापूर – प्रशांत बंब (भाजप) उसमानाबाद-कळंब – कैलास पाटील (ठाकरे गट)

महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवला

तर दुसरीकडे महायुतीतील 170 ते 175 विधानसभा जागांवरील तिढा सुटल्याचे बोललं जात आहे. तर उर्वरित जागांवर अमित शाहांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २४ आणि २५ तारखेला महायुतीमधील समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवला जाणार आहे. तसेच यात निवडणूक रणनीतीही आखली जाणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला सुनील तटकरे, प्रसाद लाड, उदय सामंत, प्रविण दरेकर हे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश