Video : विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवडीवरुन राष्ट्रवादीतही दोन मतप्रवाह, जयंत पाटलांनी व्यक्त केली नाराजी, तर अजित पवार म्हणतात..

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या अजित पवारांची निवड ही एकमुखाने झाली होती. त्यावरुन कोणतेही मतभेद नव्हते पण आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीमध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. यामध्ये कॉंग्रेसनेही तर टोकाचीच भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. या निवडीवरुन नाना पटोले यांनी ही आघाडी म्हणजे काय कायमची नाही असेच सांगितले.

Video : विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी निवडीवरुन राष्ट्रवादीतही दोन मतप्रवाह, जयंत पाटलांनी व्यक्त केली नाराजी, तर अजित पवार म्हणतात..
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 2:51 PM

मुंबई : एकीकडे मंत्रिपद मिळाले नसताना देखील (Eknath Shinde) शिंदे गटात आणि भाजपात किती ऐकी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्हीकडचे आमदार करीत आहेत तर दुसरीकडे (MVA) महाविकास आघाडीमधील धूसफूस कायम बाहेर पडताना दिसत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर ही महाविकास आघाडी काही कायमची नसल्याचे म्हणत फुटीचे संकेतच दिले आहेत. तर (Legislative Council) विधान परिषदेच्या पक्षनेतेपदी आता आंबादास दानवे यांची शिवसेनेने निवड केल्यावरुन राष्ट्रवादीमध्येही दोन मतप्रवाह समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी निवड करताना आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे म्हणत आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर अधिकचे न बोलता आम्ही सगळ्यांनी दानवेंच्या निवडीला परवानगी देल्याचे म्हणत यावर अधिकचा वाद न घालण्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही सर्वकाही अलबेल असे सध्याचे तरी चित्र नाही.

विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरुनही राजकारण

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या अजित पवारांची निवड ही एकमुखाने झाली होती. त्यावरुन कोणतेही मतभेद नव्हते पण आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीमध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. यामध्ये कॉंग्रेसनेही तर टोकाचीच भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. या निवडीवरुन नाना पटोले यांनी ही आघाडी म्हणजे काय कायमची नाही असेच सांगितले. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी शिवसेनेने इतप पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे होते म्हणत नाराजी व्यक्त केलीच आहे. अजित पवार यांनी मात्र हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यावर अधिकचे न बोलता वाद घालायचा नाही म्हणत या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी दानवे

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची वर्णी लागल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कुणाकडे याकडे लाक्ष लागले होते. अखेर शिवसेनेचे आंबादास दानवे यांची निवड व्हावी असे पत्रच सभापतींना देण्यात आल्याने अनेकांची अडचण झाली. मात्र, यावर अधिकचे राजकारण न होता या निवडीला सहमती दर्शविण्यात आली आहे. असे असातानाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपली नाराजी लपवून ठेऊ शकलेले नाहीत.

राष्ट्रवादींच्या नेत्यांचे म्हणणे काय?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी म्हणजे कायमची आघाडी नाही असे म्हणत फुटीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवया महाविकास आघाडीमध्ये सर्वच काही सुरळीत आहे असेही नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी आम्हाला विश्वासात न घेतल्याची खंत व्यक्त केली तर दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र, निवडीला सहमती असल्याचे सांगत हे प्रकरण वाढवू न देता मिटवण्याची भूमिका घेतलेली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.