AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ-शरद पवार भेटीवर अजित पवार गटातील नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “काहीही चर्चा…”

गेल्या तासाभरापासून छगन भुजबळ हे शरद पवारांची वाट पाहत आहेत. छगन भुजबळ हे वेळ न घेताच शरद पवार यांना भेटायला पोहोचले आहेत.

छगन भुजबळ-शरद पवार भेटीवर अजित पवार गटातील नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले काहीही चर्चा...
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 12:08 PM

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली. आता याबद्दल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार हे या देशाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही भेटायला जाऊ शकतं”, असे अमोल मिटकरी म्हणाले.

शरद पवार देशाचे वरिष्ठ नेते, कोणीही भेटायला जाऊ शकतं

छगन भुजबळ-शरद पवार या भेटीबद्दल अमोल मिटकरींनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ही भेट कशाबद्दल असू शकते, याबद्दलही वक्तव्य केले. “काल बारामतीच्या जनसन्मान मेळाव्यात आम्ही सोबत होतो. त्यानंतरही आम्ही तिथून एकत्र आलो. तोपर्यंत तरी अशी काहीही चर्चा झाली नव्हती. बारामती ते मुंबई यादरम्यान काहीही चर्चा नव्हती. शरद पवार हे या देशाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही भेटायला जाऊ शकतं. यामुळेच भुजबळ हे कशासाठी भेटायला गेलेत, त्यांच्यात काय चर्चा सुरु आहे, हे छगन भुजबळ बाहेर आल्यानंतर स्वत: सांगतील. भुजबळ हे कशासाठी गेलेत हे स्वत: तेच सांगू शकतात, त्या व्यतिरिक्त इतर कोणीही सांगू शकत नाही”, असे अमोल मिटकरींनी म्हटले.

शरद पवारांना कोणीही भेटू शकतं

महायुतीत नाराजी असल्याने त्यांनी भेट घेतली, असं बोललं जातंय, याबद्दल अमोल मिटकरींना विचारल्यावर त्यावरही त्यांनी भाष्य केले. “हे स्वत: भुजबळ साहेबच बाहेर येऊन सांगू शकतील. शरद पवारांना कोणीही भेटू शकतं”, असेही अमोल मिटकरींनी सांगितले.

दरम्यान छगन भुजबळ हे आज सकाळी १० च्या दरम्यान शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर रवाना झाले आहेत. गेल्या तासाभरापासून छगन भुजबळ हे शरद पवारांची वाट पाहत आहेत. छगन भुजबळ हे वेळ न घेताच शरद पवार यांना भेटायला पोहोचले आहेत. आज केवळ मिलिंद नार्वेकर यांना शरद पवारांनी भेटीसाठी वेळ दिला होता. पण छगन भुजबळ हे वेळ न घेता आल्याने ते वेटींगवर आहेत. शरद पवार हे आले नसल्याने छगन भुजबळ हे त्यांची वाट पाहत बसले आहेत.

सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे महायुतीत छगन भुजबळ हे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले असल्याचे बोललं जात आहे.

विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.