राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. काँग्रेसने काल महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. धनंजय महाडिक, सुप्रिया सुळे, संजय दीना पाटील, सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर …

ncp, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. काँग्रेसने काल महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. धनंजय महाडिक, सुप्रिया सुळे, संजय दीना पाटील, सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – NCP) उमेदवार यादी :

 • रायगड – सुनील तटकरे
 • बारामती – सुप्रिया सुळे
 • सातारा – उदयनराजे भोसले
 • बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
 • जळगाव – गुलाबराव देवकर
 • मुंबई उत्तर-पूर्व  – संजय दीना पाटील
 • कोल्हापूर – धनंजय महाडिक
 • परभणी – राजेश  विटेकर
 • ठाणे – आनंद परांजपे
 • कल्याण -बाबाजी पाटील
 • हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा
 • लक्षद्विप – मोहम्मद फैजल

मावळबद्दल सस्पेन्स

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. मावळमधून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. किंबहुना, त्यांच्या नावावर जवळपास निश्चितीही झाली आहे. मात्र, पहिल्या यादीत राष्ट्रवादीने पार्थ पवार यांचे नाव जाहीर केलेले नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत माढा, मावळ, शिरुर या बहुप्रतीक्षित लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवाराबाबत घोषणा झालेली नाही.

परभणीत नवा चेहरा

परभणी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने राजेश विटेकर हा नवा चेहरा रणांगणात उतरवला आहे. राजेश विटेकर यांचं मूळ गाव सोनपेठ तालुक्यातील विटा आहे.

राजेश विटेकरांचे वडील उत्तमराव विटेकर हे काँग्रेसचे आमदार होते.

राजेश विटेकर हे मागील 10 वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्षम आहेत. ते सध्या सोनपेठ  मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. विटेकर हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *