AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने स्वत:च्या पक्षालाच खिजवलं, पडळकरांना बाईकवरुन शहरभर फिरवलं!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं. (Gopichand Padlakar bike ride with NCP corporator)

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने स्वत:च्या पक्षालाच खिजवलं, पडळकरांना बाईकवरुन शहरभर फिरवलं!
| Updated on: Jun 27, 2020 | 4:35 PM
Share

सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. पडळकरांना राज्यात फिरु देणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं. (Gopichand Padlakar bike ride with NCP corporator)

जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी स्वत:च्या दुचाकीवर पडळकरांना बसवून, शहरभर फिरवून, राष्ट्रवादीला अक्षरश: खिजवलं. याशिवाय गोपीचंद पडळकर यांचा हारतुरे घालून सत्कारही केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच सांगली जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने, आता पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Gopichand Padlakar bike ride with NCP corporator)

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर पडळकरांविरोधात आंदोलन केलं. या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिक-ठिकाणी आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले.

आमदार पडळकर यांना फिरु देणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. मात्र जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी पडळकरांना बाईकवरुन फिरवलं. हे पाहून जत शहरात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. या प्रकारानंतर टिमू एडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते नॉट रिचेबल आहेत.

अजित पवारांचं पडळकरांवर टीकास्त्र

“आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते“, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला. साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पडळकरांवर भाष्य केलं.

शरद पवार पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले?

विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर दिली.

“पडळकरांना मी जास्त महत्त्व देत नाही. बारामतीत लोकसभा निवडणूक लढली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, विधानसभेची निवडणूक लढलं, तिथेही डिपॉझिट जप्त झालं. मग सांगलीत लोकसभा लढवली, तिथेही काही चाललं नाही. त्यामुळे काय बोलायचं” असं पवार म्हणाले.

(Gopichand Padlakar bike ride with NCP corporator)

संबंधित बातम्या 

लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार 

कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.