“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!” जयंत पाटलांनी भाकित वर्तवलं

Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणाबाबत भाकित वर्वतलं आहे. मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी किती तयार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! जयंत पाटलांनी भाकित वर्तवलं
जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 1:12 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याच्या राजकारणाबाबत भाकित वर्तवलं आहे. मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी किती तयार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार (Eknath Shinde) पडणारच!”, असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला त तितकंस सोपं जाणार नाही. कारण लोकांना स्वज्वळ, प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. पाच वर्ष आम्ही सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावतो. “2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्ते येतो, असं भाजपने म्हटलं असतं तरी लोकांनी त्यांना स्विकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील”, असंही पाटील म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोट्यावधींच्या देवाणघेवाणीतून सरकार आलं!

जयंत पाटील यांनी सरकार स्थापनेच्यावेळी काही देवाणघेवाण झाल्याचं जयंत पाटील म्हणालेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदेगटालील आमदारांचं पुढच्या टर्मला निवडूण येणं कठीण आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असं शरद पवार म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.