AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर्षवर्धन पाटलांच्या बंगल्यासमोर जाऊन अजित पवारांनी कंगवा दाखवला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar showed comb to Harshvardhan Patil) यांनी काल राजकारणातील कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर सभा घेतली.

हर्षवर्धन पाटलांच्या बंगल्यासमोर जाऊन अजित पवारांनी कंगवा दाखवला!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 19, 2019 | 10:41 AM
Share

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar showed comb to Harshvardhan Patil) यांनी काल राजकारणातील कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर सभा घेतली. इंदापूरमध्ये झालेल्या या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar showed comb to Harshvardhan Patil) जोरदार टीका टिपण्णी केली.

अजित पवार हे इंदापूर येथे आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर स्टाईलबाज नेता म्हणून केली टीका.

बारामती आणि इंदापूरचे विळ्या भोपळ्याचे वैर असून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात विस्तव  देखील जात नाही . त्यांनी इंदापुरात सभेदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना ते स्टाईलबाज राहतात, केसावरून कंगवा फिरवतात, आता मी काय माझ्या डोक्याला केसच राहिले नाहीत, पण तुम्ही असे समजू नका त्यांच्याकडेच  कंगवा  आहे, मी पण कंगवा  वापरतो असे म्हणून त्यांनी खिशातून कंगवा काढून  दाखवला आणि सभेमध्ये एकच हशा पिकला.

सध्या निवडणुकीचे धामधूम असल्यामुळे स्टार प्रचारकांची सभेसाठी धावाधाव होत आहे. त्यातच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांसमोर भाषणाला संधी मिळाली तर तो माईक सोडायला तयार नसतो, असाच प्रत्यय  इंदापूर तालुक्यातील बावडा  येथे आला. अजित पवार यांना बावडा गावची सभा उरकून पुढच्या सभेला निघायचे होते, मात्र सूत्रसंचालक भाषणासाठी वेगवेगळ्या नेत्यांची नावे घेऊन भाषण करण्यास सांगत होता. त्यावेळी वेळ होत असल्याने अजित पवार भरसभेत उठून माईककडे जाऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना