AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकारची नवीन फरार व्हा योजना”, जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा डिवचले, म्हणाले “तुम्ही बलात्कार, दंगली…”

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध घटना घडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. आता याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने ट्वीट करत महायुती सरकावर टीका केली आहे.

सरकारची नवीन फरार व्हा योजना, जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा डिवचले, म्हणाले तुम्ही बलात्कार, दंगली...
| Updated on: Sep 01, 2024 | 2:23 PM
Share

Jitendra awhad twitter : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध घटना घडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला. तर दुसरीकडे दोन आठवड्यांपूर्वी बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने ट्वीट करत महायुती सरकावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा; तुम्हाला फरार करून टाकू, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.

जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

गजापूर, विशाळगडमध्ये एवढे मोठे प्रकरण घडले… आरोपी फरार ! बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले… आरोपी संस्थाचालक फरार ! छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला… आरोपी शिल्पकार फरार ! तुम्ही बलात्कार करा; तुम्ही दंगली घडवा. पण, तुम्ही जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा; तुम्हाला फरार करून टाकू!! सरकारची नवीन “फरार व्हा योजना” !, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

विरोधक चांगलेच आक्रमक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेवरुन सरकारवर टीका केली जात आहे. आता यावरुन जितेंद्र आव्हाडांनीही टोला लगावाला आहे. सरकारची नवीन “फरार व्हा योजना” असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले. त्यासोबतच त्यांनी गेल्या महिन्याभरात झालेल्या घटनांचा उल्लेखही ट्वीटमध्ये केला आहे. या घटनांवरुन सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधक सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा