‘न्याय मिळाला नाही तर 5 दिवसाच्या आत आत्महत्या करणार’, पीडितेचा इशारा, मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. मेहबुब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता.

'न्याय मिळाला नाही तर 5 दिवसाच्या आत आत्महत्या करणार', पीडितेचा इशारा, मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार?


पुणे : सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर बलात्कारासारखे गंभीर आरोप सातत्याने होतं आहे. सध्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं असताना आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. कालांतराने हे प्रकरण शांत होत असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पीडित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.(Mehboob Sheikh’s problems are likely to increase)

‘..नाहीतर 5 दिवसाच्या आत आत्महत्ये करेन’

मला न्याय मिळाला नाही तर 5 दिवसांच्या आत आत्महत्या करणार असल्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे. इतकच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असंही तिने म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संबंधित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.

‘सर्वसामान्य आणि सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय?’

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला पण अद्याप आरोपीला अटक नाही. मेहबूब शेख यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बलात्कार केलाय. अशावेळी सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का? असा सवाल देसाई यांनी विचारला आहे. न्याय मिळाला नाही तर पीडित तरुणीने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलीने काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आपला खुलासा जाहीर केला आहे. ज्या खुलशात या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नार्को टेस्टचीही तयारी

मेहबूब शेख यांनी 30 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केलं होतं. यावेळी आपली बाजू मांडताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत रडू आलं. त्यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच खरं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपली नार्को टेस्ट करण्याचीही तयारी दर्शवली होती.

संबंधित बातम्या :

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही? चित्रा वाघ कडाडल्या

Mehboob Sheikh’s problems are likely to increase

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI