AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय, रुपाली चाकणकरांचा घणाघात

तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे," असे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar Criticizes BJP)  म्हणाल्या.

फडणवीस मुख्यमंत्री असताना 'वर्षा'वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय, रुपाली चाकणकरांचा घणाघात
| Updated on: Aug 20, 2020 | 3:57 PM
Share

पुणे : “राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकासआघाडी सरकारला शिकवू नये,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपला दिला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’वर गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीय, असा घणाघातही रुपाली चाकणकरांनी केला. (Rupali Chakankar Criticizes BJP)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यावरुन भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

“महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांना मी आठवण करुन देते की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

“माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये,” अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे. (Rupali Chakankar Criticizes BJP)

संबंधित बातम्या : 

सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये : शरद पवार

…तर सीबीआय पथकाला क्वारंटाईन करणार नाही, मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक