AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Political Crisis: MVA: ठाकरे-पवार बैठकीत काल नेमकं काय घडलं? 3 सवाल जे राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना विचारले, एवढं मोठं बंड लक्षात कसं नाही आलं?

त्याचवेळी काही बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत आल्यावर पुन्हा संपर्क करून पाठिंबा देतील अशी आशा आहे.

Maharashtra Political Crisis: MVA: ठाकरे-पवार बैठकीत काल नेमकं काय घडलं? 3 सवाल जे राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना विचारले, एवढं मोठं बंड लक्षात कसं नाही आलं?
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थेट शिवसेनेच्या नेतृत्वालाच सवाल! Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 25, 2022 | 3:36 PM
Share

महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) संकट अधिकच गडद होत चालले आहे. एक दिवसापूर्वी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकारच्या संकटाबाबत चर्चा होऊन पुढील रणनीती ठरविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट शिवसेनेच्या नेतृत्वालाच (Shivsena Leader) सवाल केला.आज पाचव्या दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Uddhav Thakcrey and Eknath Shinde)गटातील चेकमेटचा खेळ तीव्र झालाय. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांमध्ये बैठका सुरू आहेत. शिवसेनेत एवढी मोठी बंडखोरी झाली असून त्यांच्या नेत्यांना त्याची कल्पनाही नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. त्याचवेळी काही बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत आल्यावर पुन्हा संपर्क करून पाठिंबा देतील अशी आशा आहे. ते एसएमएसद्वारे बोलत आहेत असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थेट शिवसेनेच्या नेतृत्वालाच सवाल

  • एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आणि शिवसेनेचे संपूर्ण नेतृत्व गाफील कसे राहिले?
  • ‘वर्षा’ (सीएम हाऊस) येथील बैठकीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी नंतर बंडखोरी केली आणि गुवाहाटीला निघून गेले हे विचित्र वाटले.
  • तळागाळातील कार्यकर्त्यांकडून शिवसेनेला प्रतिसाद का नाही?

उद्धव ठाकरे यांनीही आपली बाजू मांडल्याचे सूत्रांनी सांगितले

  • उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे आमच्याकडे आले आणि त्यांनी आणखी दोन मुद्दे मांडले. प्रथम- पुन्हा भाजपसोबत जाण्याचा विचार करा. दुसरा- निधी आणि इतर विकासाच्या मुद्द्यावर आमदारांची तक्रार ठेवली. मी त्यांना सांगितले की, भाजपसोबत जाणे मान्य नाही, मात्र निधीच्या मुद्द्यावर चर्चा करू.
  • सभेला उपस्थित असलेले आमदारच नंतर बंडखोर झाले आणि ते गुवाहाटीला निघून गेले यावर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला.
  • लवकरच बंडखोर आमदार महाराष्ट्रात परत येतील अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली आहे. त्यापैकी काही त्याच्याबरोबर परत येतील. काही बंडखोर आमदार एसएमएसद्वारे आपल्याशी संपर्कात असल्याने त्यांच्या परत यायची आशा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादीला सांगितलंय.
  • उद्धव यांनी शरद पवारांना सांगितले की सुरुवातीला कोणत्याही हिंसाचार किंवा निषेधाविरुद्ध केडरला सूचना देण्यात आल्या होत्या. हे काउंटर प्रोडक्टीव्ह होऊ शकतं असाही अंदाज लावण्यात आला होता.
  • मात्र येत्या काही दिवसांत कार्यकर्ते मैदानात उतरतील, आंदोलनं करतील म्हणून शेवटी पवारांनी उद्धव यांना कायदेशीर पर्यायांसह सर्व पर्यायांचा, शक्यतांचा शोध घेण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.